गोव्यात डॉ. प्रमोद सावंतांच्या मंत्र्यावर सेक्स स्कँडलचा आरोप

मुख्यमंत्री डॉ. सावंतांनी (Dr. Pramod Sawant) सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या मंत्र्याची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
DR. Pramod Sawant
DR. Pramod Sawant Sarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात (Goa) मागील काही दिवस बघता महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. महिलांच्या बाबतीत गुन्हेगारीचा आकडा वाढताना दिसत आहे. यातच काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी राज्यातील एका मंत्र्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

"गोव्यातील भाजप सरकार (Goa State Government) मधील एका मंत्र्याने राजकीय दडपशाही करत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे चोडणकर यांनी म्हणले आहे. मात्र संबंधित मंत्र्याचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. संबंधित मंत्र्याच्या विरोधात सबळ पुरावे हाती असल्याची माहितीही त्यांनी पणजी येथील काँग्रेस भवनात येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

DR. Pramod Sawant
ओमिक्रॉनवर कोव्हिशिल्ड लस प्रभावी ठरणार का? अदर पूनावालांनीच दिलं उत्तर

लैंगिक अत्याचारच्या या घटनेमध्ये अडकलेल्या या संबंधित मंत्र्याने महिलेला मॅसेज आणि व्हिडिओ पाठवून मानसिक त्रास दिला असून, हे मॅसेज आणि व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ आणि मॅसेज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंतही पोहोचले असून, अद्याप त्यांनी यावर कोणतीही अॅक्शन घेतलेली नाही, या उलट संबंधित मंत्र्याला ते पाठिशी घालत आहेत.

DR. Pramod Sawant
वेगळं विदर्भ राज्य? गृह राज्यमंत्र्यांचा लोकसभेत मोठा खुलासा

ज्यात याआधीही घडलेल्या बलात्कार प्रकरणांत सरकारशी लागेबांधे असलेल्यांचा संबंध आहे. पण भाजप सरकारने पद्धतशीरपणे त्यांना अशा प्रकरणांतून बाहेर काढले आहे. त्यामुळेच पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, असेही चोडणकर यांनी नमूद केले.

गुन्हेगारी वृत्तीला मुख्यमंत्र्यांचे पाठबळ

लैंगिक अत्याचारच्या प्रकरणात सहभागी असलेल्या मंत्र्याबाबते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सर्व कल्पना आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.

देशापेक्षा दुप्पट होतायेत राज्यात बलात्कार

देशात बलात्काराचा सरासरी दर 4.3 टक्के आहे. पण गोव्यात हाच दर दुप्पट म्हणजेच 7.8 टक्के इतका आहे. यामध्ये 66 टक्के अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, अशी माहिती गिरीश चोडणकर यांनी दिली.

रक्षकच झाला भक्षक

राज्यातील महिलांच्या सुरक्षतेबाबत चिंता असून जनतेच्या सुरक्षेची शपथ घेतलेले मंत्रीच आज लैंगिक अत्याचारच्या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर येत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा, स्वत:ला सुरक्षित कसे मानायचे का?, असे सवाल बीना नाईक यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या संबंधित मंत्र्याची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

गिरीश चोडणकरांचा भाजपला इशारा

19 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गोवा दौरा आहे. या पूर्वी डॅा. सावंत यांनी संबंधित मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी किंवा त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com