2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम; कंगनानंतर कॉंग्रेस नेत्याच्या वादग्रस्त विधान

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि रशियाचे जवळचे संबंध
 2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम; कंगनानंतर कॉंग्रेस नेत्याच्या वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशात मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद कमी झाला असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर (Manishankar Ayyar) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात बोलताना अय्यर यांनी २०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे, असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे या वादात आणखी एक ठिणगी पडली आहे.

गेल्या सात वर्षांपासून आपण अमेरिकेचे (America) गुलाम बनून बसलो आहोत. असे सांगत अय्यर यांनी आपल्या भाषणात भारत-रशिया संबंधांचा (Indo-Russian relations) उल्लेख करून आपल्या विधानाला सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेसोबत तणाव होता, पण मॉस्कोसोबतचे आपले संबंध कधीही इतके तणावपूर्ण नव्हते. पण देशात भाजपचे सरकार आल्यापासून परिस्थिती पूर्णपणे बदलली असल्याचे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे.

 2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम; कंगनानंतर कॉंग्रेस नेत्याच्या वादग्रस्त विधान
ममतांचा दे धक्का! राहुल गांधींचे निकटवर्ती माजी खासदार करणार तृणमूलमध्ये प्रवेश

तर 'गेल्या 7 वर्षात आपण पाहिले की, देशात पक्षांतराची, शांततेची चर्चा होत नाही. ते अमेरिकेचे गुलाम बनून बसले आहेत आणि ते म्हणतात की, चीनपासून वाचलं पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि रशियाचे जवळचे संबंध आहेत. मात्र मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे. 2014 पर्यंत आपले रशियाशी असलेले संबंध खूपच कमी झाले आहेत.

मणिशंकर अय्यर म्हणाले की, 'रशिया नेहमीच आपल्या पाठीशी उभा राहिला आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या प्रयत्नांमुळे रशियाचे आपल्याशी असलेले संबंध सर्वच बाबतीत दृढ झाले. तेव्हा इंदिरा हे रशियन नाव झाले होते. त्या काळात तेथील अनेक मुलींचे नाव इंदिरा ठेवण्यात आले आणि उझबेकिस्तानात हे सर्वात जास्त घडले. स्वातंत्र्याच्या 8 वर्षानंतर म्हणजे 1955 पासून भारत-रशिया यांच्यातील संबंधांमध्ये सातत्याने प्रगती होत असली तरी गेली 7 वर्षे आपण अमेरिकेचे गुलाम बनून बसल्याचे पाहायला मिळते आहे, असेही त्यांनी नमुद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com