इटलीत 26 मार्च भयानक दिवस : कोरोनामुळे मृतांची संख्या उच्चांकी पातळीवर

कोरोनाचे इटलीतील संकट दिवसेंदिवस बिकट होत आहे.
ITALY HIGHEST DEATH TALLY
ITALY HIGHEST DEATH TALLY

रोम : कोरोना प्रादुर्भावाची इटलीतील परिस्थिती अधिकच बिकट होत असून गेल्या 24 तासांत 919 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांत इतके जण मृत्युमुखी पडल्याची ही उच्चांकी संख्या आहे. आतापर्यंत 9134 जणांचा या साथीत इटलीत मृत्यू झाल्याचे तेथील नागरी संरक्षण संस्थेने (सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सी) आज सांगितल्याचे राॅयटर या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

21 फेब्रुवारी रोजी इटलीत या विषाणूची लागण झाली. त्यात 21 मार्च रोजी सर्वाधिक म्हणजे 793 लोकांचा मृत्यू झाला होता. आता हा आकडा पण पार झाला आहे. गुरूवारी (ता. 26 मार्च) 712, बुधवारी (ता. 25 मार्च) 683, मंगळवारी (24 मार्च) 602 इतक्या लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 86 हजार 498 वर पोहोचली आहे. ही संख्या आधी 80 हजार 539 होती. चीनपेक्षाही कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या इटलीमध्ये जास्त झाली आहे. अमेरिकेतही लागण झालेल्यांची संख्या चीनपेक्षा जास्त झाली आहे. 

इटलीत आज 10 हजार 950 रुग्ण कोरोनाच्या प्रादुर्भावातून बरे झाले. काल हीच संख्या 10 हजार 361 होती. काल मृत झालेल्या 50 जणांची नोंद उशिरा झाली. हा आकडा काहींनी आजच्या रिपोर्टमध्ये घेतला आहे. त्यामुळे आकड्यांबाबत संभ्रमाची स्थिती असून काही माध्यमांच्या वृत्तात 969 जणांचा मृत्यू आज (शुक्रवारी) झाल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com