BJP News : "...त्यामुळे पत्रकारांनीही भाजपमध्ये प्रवेश करावा..."; केंद्रीय राज्यमंत्र्यांचं अजब वक्तव्य

Goa BJP News : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमात उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. 'पत्रकारांनीही भाजपमध्ये प्रवेश करावा' असं नाईक यांनी म्हटलं आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Panaji News, 03 Sep : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमात उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. 'पत्रकारांनीही भाजपमध्ये प्रवेश करावा' असं नाईक यांनी म्हटलं आहे.

पणजी येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे देखील उपस्थित होते. यावेळी भाजपचे गोव्यात पाच लाख सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. तर मागील वर्षी चार लाख सदस्य नोंदणी झाली होती अशी माहिती त्यांनी सांगितली.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईकांसह मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी प्रथम सदस्यत्व नोंदणी केली. तसेच राज्यभरातील साडे बारा लाख मतदारांपैकी पाच लाख सदस्यांची नोंदणी व्हावी यासाठी भाजप (BJP) प्रयत्नशील असून पक्षाच्या सदस्यांना पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांएवढेच किंवा समान अधिकार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

BJP
West Bengal Vidhan Sabha News : बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर ; 'या' कठोर शिक्षेची तरतूद!

रिपोर्टींग हा व्यवसाय

तर या सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा 25 सप्टेंबरला तर पूर्ण नोंदणी कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यात संपेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. दरम्यान, यावेळी बोलताना उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी, "पत्रकरांनी देखील भाजपचे सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश करावा. रिपोर्टींग हा व्यवसाय आहे, त्यामुळे ते पक्षात प्रवेश करु शकतात," असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता विविध पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com