मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे (farm laws) मागे घेतल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही जणांनी मोदींच्या निर्णयाचे कैातुक केलं आहे, तर काहींनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. नेहमीच वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) हिनं मोदींच्या (Narendra Modi)या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
कृषी कायदे मागे घेण्याचा मोदींचा (Narendra Modi) निर्णय लज्जास्पद अन् दुःखद असल्याचे सांगून हा निर्णय चुकीचा असल्याचे कंगनानं (kangana ranaut) म्हटलं आहे. मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काहीच क्षणात कंगनाने एक इन्स्टास्टोरी शेअर केली. यात तिने मोदींच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली.
'दु:खद, लज्जास्पद... अयोग्य... संसदेत बसणा-या लोकांनी निवडून दिलेल्या सरकारऐवजी सस्त्यावर बसणारे लोक कायदे बनवणार असतील तर हा सुद्धा 'जिहादी' देश आहे. ज्यांना हे हवंय, त्यांचं अभिनंदन,' असे कंगनानं आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये म्हटलं आहे.
मोदींच्या या निर्णयावर कंगना संतापली असली तरी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मोदींच्यानिर्णयाचे जोरदार स्वागत केलं आहे. अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराणा आदींनी मोदींच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. शेतकरी आंदोलनाला पूर्वीपासून पाठींबा देणा-या तापसीने ट्विट करून आनंद साजरा केला आहे. सोनू सूद याने मोदींचे आभार मानत, हा शेतक-यांचा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
''देशातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झुकवलं,'' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
वर्षभर या देशातील शेतकरी लढत होते. लोकांनी प्राणाची आहुती दिली. मंत्र्यांनी गाड्या चढवून त्यांची हत्या केली आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही असे संबोधण्यात आले. शेतकरी मागे हटले नाही ते दटून राहिले शेवटी त्यांना कायदा मागे घ्यावा लागला. मागील ७ वर्षांमध्ये कोणताच निर्णय मोदी सरकारने मागे घेतला नाही. आम्ही ज्या पद्धतीने देश चालवायचा आहे त्याचप्रमाणे करु पण शेतकरी लढत राहिले. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा विजय शेतकऱ्यांचा असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
केंद्रसरकारने राजकीय भयातून तीन कृषी कायदे (agricultural act) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून दिल्ली, पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पण आज अखेर केंद्राला शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं. केंद्राला तीन कृषी कायदे मागे ध्यावे लागले. पंजाब, उत्तरप्रदेशातील आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केंद्रसरकारने हा निर्णय घेतला असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.