निकालानंतर कर्नाटकातील एच.डी. कुमारस्वामी सरकार पडणार :  रमेश जारकीहोळी  

आमदार जारकीहोळींनी 24 एप्रिल ते 1 मेपर्यंत बंगळुरात तळ ठोकून असंतुष्ट आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, बहुतेक आमदारांनी 23 मेपर्यंत प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णयही लांबणीवर टाकला होता. पण, आता एका ब्रेकनंतर त्यांनी असंतुष्ट आमदारांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
निकालानंतर कर्नाटकातील एच.डी. कुमारस्वामी सरकार पडणार :  रमेश जारकीहोळी  

बंगळूर/बेळगाव : लोकसभा निवडणूक निकालानंतर युती सरकारचे पतन होईल. आमदारपदाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णयही ठाम आहे. पोटनिवडणुकीत मी पुन्हा गोकाक मतदारसंघातूनच निवडणूक लढविणार आहे. मात्र, सरकारच्या पतनाचा मुहूर्त अद्याप निश्‍चित केलेला नाही, अशी माहिती कॉंग्रेसचे असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिली.

कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार असून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे चिरंजीव  एच.डी. कुमारस्वामी  हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेली आहेत .  कर्नाटक विधानसभेत २२२ आमदारांपैकी भाजपचे सर्वाधिक १०४ आमदार आहेत . काँग्रेसचे  ८० आमदार असून त्याचा मित्र पक्ष जनता दल  सेक्युलर पक्षाचे  ३७  आमदार आहेत . गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री  एच.डी. कुमारस्वामी यांच्याविषयी असंतोष खदखदत  आहे . काँग्रेसचे काही आमदार फुटले असून भाजपच्या संपर्कातही आहेत.  कॉंग्रेसचे असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी हे देखील भाजपच्या संपर्कात आहेत . 
 
बेळगावातील एका खासगी हॉटेलात त्यांनी नुकतीच यमकनमर्डी व गोकाक मतदारसंघातील आपल्या समर्थकांची बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार जारकीहोळी बंगळूरहून बेळगावला परतले असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहे. बंगळुरात रायचूरचे खासदार बी. व्ही. नायक यांनी त्यांची भेट घेऊन समझोत्याचा प्रयत्न केला. त्याला कसा प्रतिसाद दिला याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मागील आठवड्यात राज्यात लवकरच राजकीय उलथापालथ होणार असल्याची घोषणा जारकीहोळी यांनी घोषणा केली होती. आजी मंत्री माजी मंत्री होतील व मला मोठा अधिकार प्राप्त होईल, असे त्यांनी गोकाकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात ऑपरेशन कमळची पुन्हा चर्चा सुरु झाली होती. अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी, अपक्ष आमदार आर. शंकर यांना त्यांनी बंगळुरातील सेव्हन मिनिस्टर क्वॉर्टर्समध्ये बोलावून चर्चा केली होती.

तसेच कॉंग्रेसमधील इतर असंतुष्ट आमदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. सामूहीक राजीनाम्यासाठी असंतुष्ट आमदारांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. आपल्या सोबत सर्व चार आमदार राजीनामा देणार आहेत. भाजप पक्ष संघटित करण्याचा आम्ही प्रयत्न चालविला आहे, अशी त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती दिली. बैठकीला भाजप आमदार भालचंद्र जारकीहोळीही उपस्थित होते, असे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com