#Karunanidhi करुणानिधी : तमिळनाडूवर सहा दशकांचे अधिराज्य 

भारताच्या राजकारणात सलग सहा दशकांवर सक्रिय राहिलेल्या एम. के. करुणानिधी या नावाने तमिळनाडूतील जनतेवर गारूड केले.
#Karunanidhi करुणानिधी : तमिळनाडूवर सहा दशकांचे अधिराज्य 

पुणे : भारताच्या राजकारणात सलग सहा दशकांवर सक्रिय राहिलेल्या एम. के. करुणानिधी या नावाने तमिळनाडूतील जनतेवर गारूड केले. 

चित्रपट कथालेखक, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न, जाचक प्रथा, परंपरांना विरोध, हिंदीविरोधी भूमिका या मुद्द्यांवर आयुष्यभर लढलेल्या करुणानिधींचे द्रष्टेपण त्यांच्या जीवनातील वाटचालीतून दिसते. आघाडीच्या राजकारणात त्यांनी नेतृत्व केलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची (डीएमके) वाटचाल म्हणजे करुणानिधींची वाटचाल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

`डीएमके'चे सर्वेसर्वा राहिलेले करुणानिधी पाचवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या साठ वर्षांच्या राजकारणात त्यांनी विजयाचाच इतिहास रचला. लोकसभेच्या 2004 च्या निवडणुकीत करुणानिधींनी "डीएमके'च्या नेतृत्वाखालील डाव्यांसह असलेल्या आघाडीला तमिळनाडू आणि पुडूचेरीतील 40 जागा जिंकून दिल्या. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत "डीएमके'च्या जागा 16 वरून 18 वर पोचल्या; त्याचवेळी त्यांच्या आघाडीने 28 जागा पटकावल्या. 

तमिळनाडूच्या सिंहासनावर पाचवेळा आरुढ
करुणानिधी 1961 मध्ये "डीएमके'चे खजिनदार आणि 1962 मध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष उपनेते झाले. 1967 मध्ये "डीएमके' सत्तेवर आल्यावर ते सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. 1969 मध्ये नेते आण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर करुणानिधी मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदा आरूढ झाले. त्यानंतर करुणानिधींनी पक्षाची धुरा सांभाळत पक्षविस्तार केला, त्याला घट्ट जनाधार मिळवून दिला. त्याच्या बळावरच ते पाच वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. परंपरागत विरोधक जे. जयललिता यांच्या आण्णा द्रमुकला धूळ चारत 2006 ची निवडणूक करुणानिधींनी "डीएमके'ला जिंकून दिली. 13 मे 2006 रोजी ते पाचव्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. करुणानिधी 11 वेळा तमिळनाडू विधानसभेवर निवडून गेले, एकदा सध्या विसर्जीत केलेल्या तमिळनाडू विधान परिषदेवर निवडले गेले होते. 

करुणानिधींची वाटचाल 

  • 1961 - डीएमकेचे खजिनदार 
  • 1962 - राज्य विधानसभेत विरोधी पक्ष उपनेते 
  • 1967 - सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री 
  • फेब्रुवारी 1969 - जानेवारी 1971 - तमिळनाडूचे पहिल्यांदा मुख्यमंत्री 
  • मार्च 1971 - जानेवारी 1976 - तमिळनाडूचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री 
  • जानेवारी 1989 - जानेवारी 1991 - तमिळनाडूचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री 
  • मे 1996 - मे 2001 - तमिळनाडूचे चौथ्यांदा मुख्यमंत्री 
  • मे 2006 - मे 2011 - तमिळनाडूचे पाचव्यांदा मुख्यमंत्री 
  • तमिळनाडू विधानसभेवर करुणानिधी बारा वेळा निवडून गेले होते. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com