लालूप्रसाद यादव म्हणतात, मी, शरदभाई अन् मुलायम सिंह...  

तुरूंगातून जामीनावर बाहेर आलेले लालूप्रसाद यादव आता राजकीय पटलावर सक्रीय झालेले दिसत आहेत.
Lalu Prasad Yadav meets Sharad Pawar and Mulayam singh Yadav
Lalu Prasad Yadav meets Sharad Pawar and Mulayam singh Yadav

नवी दिल्ली : तुरूंगातून जामीनावर बाहेर आलेले लालूप्रसाद यादव आता राजकीय पटलावर सक्रीय झालेले दिसत आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहे. मागील दोन दिवसांच्या दिल्लीवारीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली आहे. या भेटी राजकीय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Lalu Prasad Yadav meets Sharad Pawar and Mulayam singh Yadav)

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटल्याचे सांगत लालूप्रसाद यादव माध्यमांशी बोलताना म्हणाले, त्यांची प्रकृती ठीक नव्हती. म्हणून विचारपूस करण्यासाठी आलो होतो. त्यांच्याशिवास संसद म्हणजे वाळवंट आहे. मी, शरद भाई आणि मुलायम सिंह आम्ही तिघे अनेक मुद्यांवर लढलो आहोत. मुलायम सिंह यांच्याशी काल झालेली भेटही राजकीय नव्हती तर ती सदिच्छा भेट होती, असंही लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं आहे. 

बिहारमध्ये आपल्या पक्षाची पुन्हा सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करून यादव म्हणाले, 'बिहारमध्ये आम्ही सत्ता स्थापन करू. मी तुरूंगात असताना माझा मुलगा तेजस्वी यादव त्यांच्याशी एकटा लढला. त्यांनी चुकीच्या पध्दतीने 10 ते 15 मतांनी आमचा पराभव केला.' सध्या संसदेत गाजत असलेल्या पेगॅससच्या मुद्यावरही यादव यांनी सरकारला धारेवर धरले. पेगॅसस प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. ज्यांचा यामध्ये हात आहे, ती नावे जाहीर करायला हवीत, असंही यादव म्हणाले. 

लालूप्रसाद 23 डिसेंबर 2017 पासून तुरूंगात होते. त्यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. अनेक आजारामुळे  लालूंवर रुग्णालयात उपचार सुरू होते. चारा घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दुमका कोषागार प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना 14 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने नुकतीच त्यांची जामीनावर सुटका केली आहे. 

लालूप्रसाद पुन्हा राज्यात परतल्याने राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लालूप्रसाद यांनीही राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळं पुढील काळात बिहारमध्ये अनेक राजकीय उलाढाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com