लक्ष्मीकांत पार्सेकरांचे फडणवीसांना आव्हान; हरलो तर मी राजकारण सोडेन पण...

भाजपने (BJP) गोवा विधानसभा निवडणूकीचे (Goa Assembly Election) तिकीट नाकारल्याने पार्सेकर नाराज होते, त्यामुळं त्यांनी गेल्या आठवड्यात पक्षाला रामराम ठोकला.
Lakshmikant Parsekar- Devendra Fadanvis
Lakshmikant Parsekar- Devendra FadanvisSarkarnama

पणजी : 'ज्या पद्धतीनं माझी अवहेलना झाली. लक्ष्मीकांत पार्सेकर (Lakshmikant Parsekar) निवडून येऊ शकत नाही, असा अपप्रचार करत भाजपनं (BJP) मला तिकीट दिलं नाही. पण 14 तारखेनंतर पार्सेकर किती मतांनी निवडून येईल हे त्यांनी बघावंच, मी हरलो तर मी राजकारण सोडीन, पण मी जिंकलो तर तुम्ही राजकारणातून सन्यांस घ्यावा, असे खुले आव्हान गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) दिले आहे. (Goa Election 2022 latest news update)

भाजपने (BJP) गोवा विधानसभा निवडणूकीचे (Goa Assembly Election) तिकीट नाकारल्याने पार्सेकर नाराज होते, त्यामुळं त्यांनी गेल्या आठवड्यात पक्षाला रामराम ठोकला. विशेष म्हणजे त्यांनी इतर कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी न करता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मीकांत पार्सेकर हे 14 फेब्रुवारी रोजी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष भाजपच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते. पण मी निवडून येऊ शकत नाही. असा माझ्या विरोधात अपप्रचार करण्यात आला. मला तिकीट नाकारण्याचा डाव गोव्यात आखला आणि तो दिल्लीपर्यंत कट शिजवला गेला, असा आरोपही त्यांनी भाजप नेत्यांवर केला. पण भाजपला अजूनही आपला उमेदवार दुखावल्याचे लक्षात येत नाही. मला दुखावल्यानंतर केवळ मांद्रेम मतदारसंघातच नव्हे, तर राज्यभरातील भाजप कार्यकर्तेही नाराज झाले आहे.

Lakshmikant Parsekar- Devendra Fadanvis
आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान ; म्हणाले, 'लढाई आता सुरु'

दरम्यान, पार्सेकरांनी राजीनामा दिल्यानंतर इतर राजकीय पक्षांशी संपर्कही साधला. पण अखेर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मीकांत पार्सेकर मांद्रेम मतदारसंघातून (Mandrem constituency) निवडणूक लढवण्यासाठी भाजपनं विद्यमान आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपसाठी बंडखोर उमेदवार मोठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेक जागांवर बंडखोरी शमवण्यात भाजप नेतृत्वाला यश आले असले तरी पणजी, मंद्रेम, संगुएम आणि कंबरजुआ येथील बंडखोर उमेदवार पक्षासाठी चिंतेचे कारण बनली आहे. या बंडखोर उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (मांद्रेम ) आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचाही समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानंतर पार्सेकर हे गोव्याचे दुसरे भाजपचे मुख्यमंत्री होते. मांद्रेम विधानसभेसाठी भाजपने विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना तिकीट दिले आहे. पार्सेकर यांनी 2002 ते 2017 दरम्यान या जागेचे प्रतिनिधित्व केले होते. दयानंद सोपटे यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून पार्सेकर यांचा पराभव केला होता, परंतु 2019 मध्ये ते इतर नऊ नेत्यांसह सत्ताधारी पक्षात सामील झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com