Lok Sabha Election 2024 : बसपा अन् जेडीयूची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली उमेदवारी?

Bihar - Uttar pradesh Political News : बसपाच्या यादीत 7 मुस्लिम तर जेडीयूच्या यादीत 6 ओबीसी, 5 अति-मागासवर्गीय, 1 महादलित, 1 मुस्लिम आणि 3 सर्वण समाजातील आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशच्या 16 जागांसाठी बहुजन समाज पार्टीने आपल्या 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या जेडीयू पक्षानेही बिहारमध्ये 16 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बसपाच्या यादीत 7 उमेदवार मुस्लिम आहेत. माजिद अली हे सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून बसपाचे उमेदवार असतील. मायावतींनी कैरानातून श्रीपाल राणा आणि सहारनपूरमधून माजीद अली यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. येथे माजीद अली यांची काँग्रेसच्या इम्रान मसूद यांच्याशी चुरशीची लढत होणार आहे. (Latest Marathi News)

बसपाची पहिली यादी -

बसपाने उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून दारा सिंह प्रजापती यांना उमेदवारी दिली आहे. बसपने बिजनौरमधून विजेंद्र सिंग, नगीनामधून सुरेंद्र पाल सिंग आणि मुरादाबादमधून मोहम्मद इरफान सैफी यांच्यावर विश्वास व्यक्त करत उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे संभलमधून शौलत अली आणि अमरोहामधून मुजाहिद हुसेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मेरठमधून देवव्रत त्यागी, बागपतमधून प्रवीण बन्सल, गौतम बुद्ध नगरमधून राजेंद्र सिंह सोलंकी, बुलंदशहरमधून गिरीशचंद्र जाटव, आमलामधून आबिद अली, पीलीभीतमधून अनीस अहमद खान उर्फ ​​फूलबाबू आणि शाहजहांपूरमधून दोद्रम वर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
NCP Manifesto Committee : लोकसभेसाठी राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती जाहीर; वळसे पाटलांकडे अध्यक्षपदाची धुरा

बसपा (BSP) प्रमुख मायावती यांनी झीशान खान यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. रामपूरमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून, त्यासाठी उमेदवारी प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 26 आणि 27 मार्च हे दोनच दिवस उरले आहेत. आतापर्यंत भाजपने विद्यमान खासदार घनश्याम सिंह लोधी यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते.

जेडीयूच्या पहिली यादी -

नितीशकुमार (Nitish Kumar) यांचा पक्ष जेडीयूने लोकसभा (Lok sabha) निवडणुकीसाठी बिहारमधील 16 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत 4 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. जेडीयूचे माजी अध्यक्ष लालन सिंह यांना मुंगेरमधून, आनंद मोहन यांच्या पत्नी लवली मोहन यांना शिवहरमधून, अजय मंडल यांना भागलपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. 16 उमेदवारांपैकी 6 ओबीसी, 5 अति-मागासवर्गीय, एक महादलित, एक मुस्लिम आणि तीन सर्वण समाजातील आहेत. दोन महिला उमेदवारही आहेत. एनडीएमधील जागावाटपामध्ये जेडीयूला 16 जागा मिळाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com