Lok Sabha Election 2024: "आम्हाला विजयी केलं नाही तर..." काँग्रेस आमदारानं जाहीर सभेतून मतदारांना धमकावलं

Congress MLA Raju Kage Viral Video: मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते भरमसाठ आश्वासनं देताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी नेते मतदारांना धमक्या देत असल्याच्या घटनादेखील समोर येत आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Karnataka Congress MLA Video Goes Viral: देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधुम जोरदार सुरु आहे. आतापर्यंत देशातील दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. तर उरलेल्या जागांसाठीचं मतदान टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. यासाठी प्रत्येक पक्षाकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते भरमसाठ आश्वासनं देताना दिसत आहेत.

मात्र, काही ठिकाणी नेते मतदारांना धमक्या देत असल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारांना धमकावणं हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं माहित असतानाही नेत्यांकडून मतदारांना धमकावण्याचे प्रकार कमी होताना दिसत नाहियेत. अशातच आता एका काँग्रेस (Congress) आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मतदारांना मतं दिलं नाही तर घरातील वीजपुरवठा बंद करेन अशी धमकी देताना दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा व्हायल व्हिडिओ कर्नाटकातील (Karnataka) बेळगावी जिल्ह्यातील कागवाडचे काँग्रेसचे आमदार राजू केज यांचा असून प्रचाराच्या भाषणादरम्यान त्यांनी मतदारांना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. या व्हायरल व्हिडिओत आमदार राजू केज मतदारांना म्हणतात, "तुम्ही आमच्या पक्षाला मोठ्या मतांनी विजयी केलं नाही, तर आम्ही तुमच्या घरांचा वीजपुरवठा बंद करू, तसंच मी माझ्या शब्दांवर ठाम आहे." असं राजू केज यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi
KCR News : के. चंद्रशेखर रावांना आयोगाचा दणका; 'या' कालावधीत प्रचार करण्यावर बंदी...

केज यांनी काल मंगळवारी (30 एप्रिल) रोजी एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, "140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कोणी पंतप्रधान होणार नाही का? अनेक तरुण म्हणतात, मोदी तर मोदी आहे, पण तुम्ही त्यांच्यामागे लाळ गाळत का फिरता?" असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

केज यांच्या वक्तव्यानंतर भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

काँग्रेस आमदार केज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, "काँग्रेसकडे 'मोहब्बत की दुकान' नाही तर हे 'धमकीचे भाईजान' आहेत.कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मागील निवडणुकीत मतदारांना इशारा दिला होता की, मतदारांनी त्यांच्या भावाला मतं दिली नाहीत तर त्यांची विकासकामं केली जाणार नाहीत." केज यांच्या वक्तव्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला टीकेचा सामना करावा लागत आहे. शिवाय आता केज यांच्या वक्तव्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com