भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका हेड कॉन्स्टेबलच्या घरी मंगळवारी लोकायुक्तांकडून छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये हेड कॉन्स्टेबलच्या मालमत्तेचे आकडे पाहून अधिकारीही थक्क झाले. कॉन्स्टेबलकडे चार कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. फार्म हाऊस, चौदा गाड्यांही जप्त करण्यात आल्या आहे. करोडपती हेड कॉन्स्टेबलचा रुबाब समोर आल्यानंतर पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.
सच्चिदानंद सिंह असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. जबलपूर येथील लोकायुक्तांनी मंगळवारी उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्या घरी छापेमारी केली. सिंह हे सध्या तिलवारगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस उप अधिक्षक (लोकायुक्त) जे. पी. वर्मा यांनी याबाबत माहिती दिली.
वर्मा म्हणाले, 'आमच्या टीमने टाकलेल्या छाप्यामध्ये 4 कोटी 39 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. फार्म हाऊस, 14 गाड्या, शेत जमीन, दागिने यांसह अन्य संपत्तीचा त्यात समावेश आहे. आता पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.' यापूर्वी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे असाच प्रकार समोर आला होता.
ऑक्टोबर महिन्यात शिवपुरी जिल्ह्यात सहायक समिती व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीमध्ये बारा हजार रुपयांचे वेतन घेणाऱ्या या व्यवस्थापकाकडे कोट्यवधींची संपत्ती आढळून आली होती. जिल्ह्यातील कोलारस तहसीलअंतर्गत असलेल्या पचावली सहकारिता बँकेत काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.
या प्रकरणातील कर्मचाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने विजयपुरम कॉलनीमध्ये राहणारे एम. एस. भार्गव यांच्या घरी छापा टाकला होता. यामध्ये मोठं घबाड हाती लागले होते. त्यानंतर काही दिवसांतच हेड कॉन्स्टेबलची कोट्यवधींची संपत्ती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.