ममतादीदींमुळे मिळाले  बुद्धदेव यांना "आधार' 

ममतादीदींमुळे मिळाले  बुद्धदेव यांना "आधार' 

कोलकाता ः राजकीय व्यक्तींचे परस्परांशी कायम कडवट संबंध नसल्याचे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले आहे. आजारपणामुळे आधार कार्ड काढू न शकलेले माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या मदतीला दीदी धावल्या आणि बुद्धदांना आधार कार्ड मिळाले. 

राज्यात सध्या आधार कार्डाची धामधूम सुरू आहे. मात्र, 31 मेनंतर ही केंद्रे बराच काळ बंद होती. बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही हे कार्ड काढावयाचे होते. मात्र, केंद्रे बंद आणि आजारपणामुळे त्यांना ते शक्‍य होत नव्हते. कोलकता महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ही बाब समजल्यावर दीदींनी लगेच संबंधितांना कार्यवाही करण्याचा आदेश दिला. लगेच अधिकारी बुद्धदेव यांच्या घरी गेले आणि त्यांनी 

आधार कार्डाची प्रक्रिया पूर्ण केली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिल्यावर हे समजले. 
बुद्धदेव भट्टाचार्यांच्या मदतीला धावण्याची ममतांची ही पहिलीच वेळ नाही. पूर्वी एकदा बुद्धदेव यांना श्‍वासोच्छ्वासाचा त्रास होत असल्याचे समजल्यावर दीदींनी तिकडे धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

नंतर एकदा झाडाच्या मुळाचा घराला धोका असल्याची तक्रार बुद्धदेव यांच्या पत्नी मीरादेवी यांनी केल्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित ही तक्रार दूर केली होती. बुद्धदेव यांच्या घराची डागडुजी सुरू असतानाही दीदींनी त्यांना तात्पुरते दुसरे निवासस्थान देण्याची तयारी दाखविली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com