नारायण राणे औद्योगिक विकास करतील; गडकरींना विश्‍वास…

तामिळनाडूच्या फिशरमॅनसाठी एक बोट तयार केली आहे. ती १०० नॉर्टीकल मैलपर्यंत जाते आणि त्यामध्ये बर्फही तयार होतो. कोल्ड स्टोरेजही आहे. पण आपल्या महाराष्ट्रातील फिशरमॅनच्या बोटी केवळ १० नॉर्टीकल मैलापर्यंतच जातात.
Narayan Rane - Nitin Gadkari
Narayan Rane - Nitin Gadkari

नागपूर : नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री होते, When Narayan Rane was Chief Minister तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून काम केले आहे. राणे आणि मी विरोधी पक्षनेते होतो, तेव्हाही त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांचा आणि माझा जवळचा ऋणानुबंध राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाकरिता ते निश्‍चितच चांगले काम करतील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी व्यक्त केला. नुकतेच केंद्रात मंत्री झालेले भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील Bhagwat Karad, Bharti Pawar and Kapil Patil यांच्या आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. 

ठाण्यातून आजपर्यंत कुणीच मंत्री झाले, नाही हे मला कपिल पाटलांनी सांगितले. खरे तर ही आश्‍चर्याची गोष्ट आहे. नारायण राणे हे कोकणचे आहेत आणि काही अंशी ठाणे हा कोकणचाच एक भाग असल्यासारखा आहे. राणे औद्योगिक विकास करताना मासेमारी या व्यवसायालाही उभारी देतील. एमएसएमएई अंतर्गत आम्ही तामिळनाडूच्या फिशरमॅनसाठी एक बोट तयार केली आहे. ती  १०० नॉर्टीकल मैलपर्यंत जाते आणि त्यामध्ये बर्फही तयार होतो. कोल्ड स्टोरेजही आहे. पण आपल्या महाराष्ट्रातील फिशरमॅनच्या बोटी केवळ १० नॉर्टीकल मैलापर्यंतच जातात. आपण आपल्या मासेमार बांधवांना या बोटी उपलब्ध करून दिल्या तर त्यांचे उत्पन्न ६ ते ७ पटींनी वाढणार आहे आणि राणे हे काम निश्‍चितच करतील, असेही गडकरी म्हणाले.

‘ते’ पुस्तक क्रांती घडवेल...
आज या ठिकाणी कपिल पाटील यांनी ज्याचा उल्लेख केला, ते पुस्तकदेखील एका मराठी आयएएस अधिकाऱ्याने लिहिलेले आहे. त्यांचे नाव आहे अरुणा शर्मा. त्या मध्यप्रदेशच्या ग्रामीण विकास विभागाच्या सचिव होत्या आणि भारत सरकारमध्ये स्टील मंत्रालयाच्यादेखील सचिव होत्या. त्या मूळच्या भोपाळच्या आहेत, पण मराठी आहेत. त्यांनी ग्रामीण विकासामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. शिवराजसिंह चव्हाण यांच्या कार्यकाळात अरुणा शर्मा ग्रामीण विकास विभागाच्या सचिव होत्या. तेथील त्यांच्या अनुभवावर त्यांनी पुस्तक लिहिले आणि ते पुस्तक मला त्यांनी दिले. ८ राज्यांनी ते पुस्तक जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंचांना दिले. तेथे मोठे बदल घडून आले आहेत. 

महाराष्ट्रातील ग्रामविकास मंत्र्यांनीही शक्य झाल्यास ते पुस्तक राज्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांना उपलब्ध करून द्यावे. आपल्याकडेही ग्रामीण विकासच आलेला आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावले पाहिजे, अशी सूचना गडकरींनी केली. कारण हे पुस्तक ग्रामीण विकासात क्रांती घडवू शकते, असेही ते म्हणाले. मी ज्यावेळी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री होतो, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनी मला दोन योजना तयार करायला दिल्या होत्या. त्यातील एक महत्वाची म्हणजे ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना’. ही योजना तयार करण्याचे काम मला मिळाले, हे माझे सौभाग्य आहे. या विषयातही शर्मा यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे माझा नेहमी त्यांच्याशी संपर्क यायचा. ग्रामीण विकासासाठी भारत सरकारकडून सर्व राज्यांना जर आपण ते पुस्तक दिले, तर त्यांचा चांगला फायदा होणार आहे, असेही गडकरी म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com