Narendra Modi Degree : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पदवीवर प्रश्नचिन्हं ; निकालकडे लक्ष!

Narendra Modi Degree : 1978 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील परीक्षेला बसले.
NArendra Modi
NArendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पदवीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या सात वर्षांपासून अनेक आरटीआय कार्यकर्त्यांनी गुजरात विद्यापीठाकडे मोदींच्या शैक्षणिक पदवीबाबत माहिती मागवली होती, मात्र त्यांना माहिती कधीच मिळू शकली नाही. यानंतर या प्रकरणाला न्यायालयात नेण्यात आले. आता यावर दिल्ली उच्च न्यायालयाने पुढील वर्षी ३ मेपर्यंत म्हणजे तब्बल सहा महिन्यांनी पुढे सुनावणी ढकलली.

केंद्रीय माहिती आयोगाच्या सूचनेवरून गुजरात विद्यापीठाने नरेंद्र मोदींच्या पदवीची माहिती सार्वजनिक केली. मात्र यानंतर काँग्रेसनेकडून हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, नरेंद्र मोदींनी पदवी कोठून घेतली व त्यांचा जन्म वर्ष काय? दरम्यान दिल्ली विद्यापीठाने 2017 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाच्या (सीआयसी) आदेशाला आव्हान दिले होते, ज्यात 1978 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील परीक्षेला बसले होते तेव्हा बीए उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डची तपासणी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले होते.

NArendra Modi
Pune News : बेकायदा फ्लेक्स प्रकरण : उपायुक्तांना दंड तर झाला, नोटीस काही पोहचेना!

यावर काँग्रेसचे गुजरात नेते शक्ति सिंह गोहिल यांनी यापूर्वीच म्हंटले होते की, "केंद्रीय माहिती आयुक्तांच्या आदेशानंतर गुजरात विद्यापीठाने माहिती दिली की, नरेंद्र मोदी यांनी 1983 मध्ये राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी मोदींनी कोणत्या विद्यापीठात पदवीचे प्रमाणपत्र दिले हे सांगितले जात नाही. निवडणुकीनुसार आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची कागदपत्रे, नरेंद्र मोदी यांनी 1967 मध्ये एसएससी उत्तीर्ण केले, 1978 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए पूर्ण केले आणि 1983 मध्ये गुजरातमधून पदव्युत्तर पदवी घेतली. परंतु आजपर्यंत त्यांचे पदवीचे प्रमाणपत्र कोणीही पाहिले नाही आणि हे गुजरात विद्यापीठही सांगत नाही. या बाबतीत काहीही."

NArendra Modi
अखेर राहुल गांधींच्या सभेत मनसैनिक पोहचले अन् काळे झेंडे दाखवले

आता हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर याबाबत मागील पाच वर्ष यावर सुनावणी होत आहे. आता यावर दिल्ली उच्च न्यायालयाने पुढील वर्षी ३ मेपर्यंत म्हणजे तब्बल सहा महिन्यांनी पुढे सुनावणी ढकलली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com