US Flights News: अमेरिकेची आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प; हजारो प्रवासी खोळंबले; नेमके कारण काय?

US Flight News : जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेची विमान सेवा ठप्प झाली
UN Flight News :
UN Flight News : Sarkarnama

US Flight News : जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेची विमान सेवा ठप्प झाली आहे. काही तात्रिंक बिघाडामुळे ही विमानसेवा ठप्प झाल्याचं सांगण्यात येत असून यामुळे अनेक प्रवासी खोळंबले आहेत. फेडरल एव्हीएशन सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अमेरिकेमध्ये एकाही विमानाने उड्डाण घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.

UN Flight News :
Pankaja Munde : राजकीय संघर्षानंतरही भावा-बहिणीच्या नात्यात ओलावा : पंकजा पोहचल्या धनंजय मुंडेच्या भेटीसाठी!

या तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेच्या विमान सेवेला मोठा फटका बसला आहे. तर अमेरिकेतील वेगवेगळ्या विमानतळांवर मोठ्या संख्येने प्रवासी अडकून पडले आहेत. तर एफएएच्या माहितीनुसार, ज्या यंत्रणेच्या माध्यमातून विमानांच्या उड्डाणांचे नियोजन केले जाते. याच यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान सेवा ठप्प झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

UN Flight News :
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या घरातून 'ईडी'ला काय मिळालं?

दरम्यान, झालेल्या तांत्रिक बिघाडावर दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानांच्या उड्डाणांचे नियोजन करण्याच्या व्यवस्थेमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान सेवेला फटका बसला आहे. तर ही यंत्रणा पूर्ववत होईपर्यंत प्रवाशांना मात्र वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर भारतीय (India) विमान सेवेवर याचा अद्याप परिणाम झालेला दिसून आलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com