मोठी बातमी ! NIA ने आवळल्या खलिस्तानी दहशतवाद्याच्या मुसक्या

NIA Arrests Terrorist देशभरातील अनेक राज्यातील पोलीस त्याच्या शोधत होते.
NIA   NIA Arrests Terrorist
NIA NIA Arrests Terrorist Sarkarnama

NIA Arrests Terrorist : राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( Most Wanted ) खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केल्याची माहिती आहे. कुलविंदरजीत सिंह उर्फ ​​‘खानपुरिया’ असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. खानपुरिया'वर पाच लाख रुपयांचं बक्षीस होतं. बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) या दहशतवादी संघटनांशी त्याचे संबंध आहेत. अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील अनेक हत्या आणि तसेच दहशतवादी कारवायांमध्ये खानपुरियाचा हात होता. 2019 पासून तो फरार होता. पण खानपुरिया शुक्रवारी बँकॉकहून भारतात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. यावेळी त्याला पोलिसांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली.

NIA   NIA Arrests Terrorist
Gujrat Election : अखेर गुजरात निवडणुकांच्या तारखा जाहीर ; दोन टप्प्यात होणार मतदान!

नवी दिल्लीत 90 च्या दशकात कॅनॉट प्लेस येथे बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर काही प्रकरणे आणि अन्य राज्यांमध्ये ग्रेनेड हल्ल्यांमध्येही खानपुरिया'चा मोठा सहभाग होता. तपास यंत्रणांच्या अहवालानुसार, खानपुरिया हा पंजाबमधील डेरा सच्चा सौदाशी संबंधित असलेल्या आस्थापना आणि पोलीस-सुरक्षा कर्मचाऱ्यांवर लक्ष्य साधून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. देशभरातील अनेक पोलीस शोधत होते.

पंजाबसह संपूर्ण देशात दहशत निर्माण करण्यासाठी खानपुरिया'ने भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ, चंदीगडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केलं होतं. त्याने निवडलेल्या काही लक्ष्यांची रेकीही केली होती. त्याच्याविरुद्ध 30 मे 2019 रोजी पोलीस स्टेशन स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल (SSOC), अमृतसर येथे आणि त्यानंतर 27 जून 2019 रोजी NIA द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com