गडकरींची नवी ‘स्कीम' : बेशिस्त वाहन दाखवा, ५०० रूपये मिळवा!

Nitin Gadkari | नितीन गडकरी यांची आणखी एक लोकप्रिय योजना...
Nitin Gadkari News in Marathi, BJP Latest Marathi News
Nitin Gadkari News in Marathi, BJP Latest Marathi Newssarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे कायमचं आपल्या अभिनव मात्र लोकप्रिय घोषणांसाठी ओळखले जातात. आज दिल्लीतील (Delhi) एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी वाहनांची बेसुमार संख्या व नियमांचा भंग करण्याची सर्रास प्रवृत्ती याला वैतागून अशीच एक लोकप्रिय घोषणा केली आहे. (Nitin Gadkari Latest News)

रस्त्यावर नियमभंग करून, चुकीच्या पध्दतीने पार्किंग केलेल्या वाहनाचे छायाचित्र काढून पाठवा व ५०० रूपयांचे रोख इनाम मिळवा, अशा प्रकारची घोषणा गडकरी यांनी केली आहे. यावेळी गडकरी यांनी नियम तोडून रस्त्यांवर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांची प्रवृत्ती रोखण्यासाठी १ हजार रूपयांचा दंड करण्याबाबत आपले मंत्रालय लवकरच कायदा आणण्याचाही विचार करत आहे, असेही सांगितले. (Nitin Gadkari Latest News)

Nitin Gadkari News in Marathi, BJP Latest Marathi News
कौशल्य कोणाकडे आहे ते विधान परिषद निवडणुकीत कळेल : अजित पवारांचे भाजपला आव्हान

इमारती बांधताना पार्किंगसाठी पुरेशी जागा न ठेवणे खेदकारक असल्याचे सांगून पार्किंगच्या जागेचा अभावामुळे लोक रस्त्यांवरच वाहने उभी करतात, असे गडकरी म्हणाले. गाड्यांच्या वाढत्या संख्येवर बोलताना नागपूरला माझ्याकडे स्वयंपाक करणाऱ्यांकडे २-२ सेकंड हॅंड गाड्या आहेत. चार जणांच्या कुटुंबात आज ६ कार असतात, अशीही खंत गडकरी यांनी व्यक्त केली.

गडकरी आता त्यांच्या मंत्रालयासमोरची पार्किंग व्यवस्था सुधारणार का?

गडकरी यांनी बेशिस्त वाहन चालकांना प्रतिबंध लावण्यासाठी पावलं उचलली असली तरीही त्यांच्या मंत्रालयासमोरचे दृश्य आठवले नसावे असे बोलले जाते. नवीन संसदेचे काम सुरू नव्हते तेव्हापासूनच परिवहन भवनासमोरही थेट रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे त्यांनी बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांबाबत रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. (Nitin Gadkari Latest News)

Nitin Gadkari News in Marathi, BJP Latest Marathi News
विधान परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का; काँग्रेसने विजय नोंदवून रचला इतिहास

मात्र आता त्यांच्या मंत्रालयाच्या आसपासच्या रस्त्यांवर पार्किंगच्या नियमांची एशीतैशी करून अगदी फूटपाथवरही बिनदिक्कत लावलेल्या अनेक वाहनांची छायाचित्रे मंत्रालयाकडे पाठवून ५००-५०० रूपये मिळविण्याची पहिली नामी संधी संसद मार्ग, रफी मार्ग, विठ्ठलभाई पटेल हाऊस, पटेल चौक परिसरातील लोकांना मिळाल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com