देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर होते. यावेळी ते संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. तसेच त्यांच्या हस्ते देहूमधील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. शिळा मंदिर केवळ भक्तीच्या शक्तीचे केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालाही सशक्त करणारे केंद्र असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. "मस्तक माझे पायांवरी, या वारकरी संतांच्या", या ओळींनी भाषणाची सुरूवात केली. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अंभगातील अनेक ओळी म्हणतं त्या आजच्या काळात देखील कशा उपयुक्त आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. (PM Narendra Modi Latest Marathi News)
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते तेव्हा त्यांनी हातातील साखळदंडांच्या चिपळ्या केल्या अन् तुकारामांचे अभंग म्हटले. त्यांचे अभंग हे जेवढे भागवत भक्तासाठी महत्वाचे आहेत तेवढेच ते राष्ट्रनिर्मीतीसाठी महत्वाचे आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. (PM Narendra Modi Latest Marathi News)
देहू संतशिरोमणी संत तुकारामांचे जन्मस्थान आणि कर्मभूमीही असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान विठ्ठल आणि सर्व वारकरी, संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की, मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ संताचा सत्संग आहे. संताची अनुभुती झाली की देवाची अनुभूती आपोआप होते. आज देहूतील या पवित्र भूमीत येण्याचे सौभाग्य मला मिळाले. आज मला तीच अनुभूती येत आहे. (PM Narendra Modi in Dehu)
धन्य देहू गाव पुण्य भूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे, उच्चारिती वाचे नाम घोष, या ओळींमधून मोदींनी देहूनची महती सांगितली. काही महिन्यांपूर्वीच मला पालखी मार्गात दोन राष्ट्रीय राजमार्गाचे चारपदीकरणच्या भूमीपुजन करण्याची संधी मिळाली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे पाच टप्प्यात तर संत तुकाराम पालखी मार्गाचे तीन टप्प्यात काम होणार आहे. सर्व टप्पयात 350 किलोमीटर लांबीचे महामार्ग बनतील. त्यावर 11 हजार कोटींहून अधिक खर्च केला जाईल. यातून विकासालाही गती मिळेल, असे मोदी यांनी सांगितले.
आज पवित्र शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी देहूत येण्याचे भाग्य लाभले. तुकारामांचे बोध व वैराग्याची साक्षी असलेली शिळा ही भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा स्वरूप आहे. हे शिळा मंदिर केवळ भक्तीच्या शक्तीचा केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालाही सशक्त करते. देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. भारत शाश्वत आहे, कारण भारत संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात देश आणि समाजाला दिशा देण्यासाठी कोणती न कोणती महान आत्मा जन्म घेत आहे. अशा महान विभूतींनी आपल्या शाश्वततेला सुरक्षित ठेवत भारताला गतीमान बनवले आहे, असे मोदींनी नमूद केले.
संत तुकाराम हे समाजच नाही तर भविष्यासाठीही आशाचे किरण बनून पुढे आहे. त्यांनी आपल्या संपत्तीला लोकांच्या सेवेला समर्पित केले. ही शिळा त्यांच्या त्यागाचे प्रतिक आहे. त्यांच्या अभंगाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो शाश्वत राहोत तोच अभंग असतो. आजही देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मुल्यांच्या आधारे पुढे जात आहे. तर त्यांचे अभंग आपल्याला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. संतांच्या अभंगातून रोज नवी प्रेरणा मिळते, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.