पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उचललं मोठं पाऊल

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Petrol and Diesel prices
Petrol and Diesel prices

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच राहिली असून, चालू महिन्यातील ही सोळावी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा (Crude Oil) भडका उडाल्याने आता देशातील जनेतला बसणारे इंधन दरवाढीचे चटके वाढू लागले आहेत. आगामी काळात हे चटके आणखी वाढू नयेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदी हे आज जागतिक तेल कंपन्यांचे प्रमुख आणि तज्ञांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजता हा संवाद होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.

Petrol and Diesel prices
अमरिंदरसिंग यांच्यानंतर 24 तासांतच काँग्रेसला बसला दुसरा मोठा धक्का

मोदी हे 2016 पासून दरवर्षी जागतिक तेल कंपन्यांचे प्रमुख आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधतात. यात या क्षेत्रातील महत्वाचे मुद्दे आणि नवीन संधी यावर चर्चा होत असते. भारतासोबत भागीदारी आणि गुंतवणूक यावरही यात चर्चा होते. आजच्या संवादात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी हेसुद्धा सहभागी होणार आहेत. भारताला खनिज तेलाचा पुरवठा योग्य भावाने व्हावा, यावरही यात चर्चा होऊ शकते. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव वाढल्याने पेट्रोलियम मंत्रालयही अनेक देशांशी आधीपासूनच यासंदर्भात चर्चा करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Petrol and Diesel prices
तुरुंगातून सुटल्यानंतर राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीनं उचललं मोठं पाऊल

दरम्यान, पेट्रोल, डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 35 पैशांची वाढ करण्यात आली. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 106.19 रुपये तर मुंबईत 112.11 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 94.92 रुपये आणि मुंबईत 102.89 रुपयांवर पोचला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. चालू महिन्यात पेट्रोल, डिझेलची दरात 16 दिवस वाढ झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com