पीएसआय भरती घोटाळा : थेट अतिरिक्त पोलिस महासंचालकाला अटक

महाराष्ट्रातील पोलिस भरतीत घोटाळा झाला होता. आता कर्नाटकातही पोलिस भरती प्रक्रियेत घोटाळा उघड झाला आहे.
Karnataka police recruitment
Karnataka police recruitmentSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर - महाराष्ट्रातील पोलिस भरतीत घोटाळा झाला होता. आता कर्नाटकातही पोलिस भरती प्रक्रियेत घोटाळा उघड झाला आहे. कर्नाटकातील पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) घोटाळ्यात सामील असल्याच्या कारणावरून गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमृत पॉल यांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांची घोटाळ्यातील भूमिका उघड झाली आहे. हा घोटाळा झाला तेव्हा अमृत पॉल हे राज्य पोलिस भरती शाखेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) होते. आयपीएस दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यास अटक करण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. ( Karnataka police recruitment scam News Update )

सोमवारी सीआयडी अधिकाऱ्यांनी अमृत पॉल यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेले. अधिक चौकशीसाठी त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Karnataka police recruitment
संग्राम जगताप विधानसभेत मतदानाला का पोहोचले नाहीत.. त्यांनीच सांगितला अनुभव!

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएसआय भरतीसाठीचे पेपर ठेवलेल्या स्ट्राँग रूमची हेराफेरी आणि प्रश्नपत्रिका तसेच ‘ओएमआर शीट’शी छेडछाड केल्याबाबतचे पुरावे मिळाल्यानंतर अमृत पॉलना अटक केली. स्ट्राँग रूमसाठी जबाबदार असलेले डीएसपी शांतकुमार यांनाही यापूर्वी अटक केली होती. पोलिसांच्या तपासानुसार या घोटाळ्यात 100 कोटींहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पोलिस उपनिरीक्षकांच्या 545 पदासाठी 54 हजार 287 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. मात्र, लवकरच अनेक अधिकाऱ्यांवर भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप झाला. या प्रकरणी कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) 50 हून अधिक जणांना अटक केली आहे. ज्यात सरकारी अधिकारी, एजंट आणि उमेदवारांचा समावेश आहे.

Karnataka police recruitment
आजारी आमदार लंके अचानक विधानसभेत दिसले

कल्याण कर्नाटक विभागातून निवडलेल्या 67 उमेदवारांमध्ये सातवा क्रमांक मिळवणाऱ्या वीरेश एन. या उमेदवाराने 150 गुणांच्या वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेत 100 पैकी केवळ 21 प्रश्नांची उत्तरे दिली होती. तरीपण त्याला एकूण 121 गुण मिळाल्याचे आढळून आल्याने परीक्षेतील घोटाळा उघड झाला. त्याच्या ‘ओएमआर शीट’च्या कार्बन कॉपीवरून हे स्पष्ट होते.

Karnataka police recruitment
शिवसेना म्हणजे युक्रेन नाही : राऊतांनी सांगितले भाजपने मुख्यमंत्रीपद का सोडले

21 प्रश्‍नांची उत्तरे, गुण 121

पोलिस भरती कक्षात प्राप्त झालेल्या उमेदवार वीरेशच्या ‘कोडेड ओएमआर शीट’ची इतर उमेदवारांसाठी दिलेल्या ‘ओएमआर शीट’शी तुलना केली असता वीरेशने परीक्षा हॉलमध्ये केवळ 21 प्रश्नांची उत्तरे दिली. पोलिस भरती कक्षाला मिळालेल्या ‘ओएमआर शीट’वरून असे दिसून आले की, त्याने सर्व 100 प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, गुण मात्र 121 मिळाले आहेत, असे या प्रकरणातील सीआयडी एफआयआरात नमूद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com