भाजपला मागे टाकत 'आरजेडी' बनला बिहारमधील सर्वात मोठा पक्ष

एमआयएमच्या चार आमदारांच्या प्रवेशामुळे आरजेडीकडील आमदारांची संख्या 80 वर पोहचली.
Bihar Political News, Tejashwi Yadav Latest News
Bihar Political News, Tejashwi Yadav Latest NewsSarkarnama

पाटणा : 'एआयएमआयएम'च्या पाच आमदारांपैकी चार जण फुटले असून त्यांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये (RJD) प्रवेश केला. त्यामुळे भाजपला मागे टाकत आरजेडी हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. आता आरजेडीकडील आमदारांची संख्या 80 वर पोहचली आहे. तर भाजपकडे 77 आमदार आहेत. (Bihar Political Crisis)

मागील विधानसभा निवडणुकीतच आरजेडीचे सर्वाधिक 75 आमदार निवडून आले होते. पण महाआघाडीला बहुमत न मिळाल्याने ते सत्तेपासून दूर राहिले. त्यावेळी भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत व्हीआयपी पक्षाच्या तिकीटाकवर चार जण निवडून आले होते. त्यातील एकाचे निधन झाले. तर तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचा आकडा 77 पोहचला.

Bihar Political News, Tejashwi Yadav Latest News
बिहारमध्येही राजकीय भूकंप; ओवेसींना मोठा धक्का, पाचपैकी चार आमदार फुटले

आरजेडीचे 2020 मध्ये 75 आमदार जिंकून आले होते. तर 2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाला एक जागा मिळाली. त्यामुळे हा आकडा 76 वर पहोचला. आता ओवेसी यांच्याकडील चार आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आरजेडीकडील आमदारांची संख्या 80 पोहचली असून राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे.

दरम्यान, 'एमआयएम'चे (AIMIM) अमौर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अख्तरूल ईमान, बायसी मतदारसंघातील सय्यद रुकनुद्दीन अहमद, जोकीहाटचे शाहनवाज आलम, कोचधामनचे मोहम्मद इजहार असफी, बहादुरगंजचे मोहम्मद अंजार नईमी विधानसभेत दाखल झाले होते. त्यापैकी चार जणांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या उपस्थितीत या आमदारांनी पक्षप्रवेश केला.

अख्तरूल ईमान हे एकटे आता पक्षासोबत असून उर्वरित चौघांनी ओवेसी यांची साथ सोडली. मागील निवडणुकीत एमआयएमने जोर लावला होता. या निवडणुकीत पक्षाला सीमांचल भागामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. या भागात एकूण 24 मतदारसंघ आहेत. बहुतेक मतदारसंघ मुस्लिमबहूल आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com