Supreme Court Decision : राहुल गांधींची खासदारकी रद्द करणाऱ्या न्यायाधीशांची पदोन्नती रोखली..; नियमांचे उल्लंघन...

SC Bans Promotion of Judge : ६८ न्यायाधीशांच्या पदोन्नतीसाठी काढलेला आदेश रद्द केला आहे
SC Bans Promotion of Judge
SC Bans Promotion of JudgeSarkarnama

SC Bans Promotion of Judge : सुप्रीम कोर्टाने आज (शुक्रवारी) मोठा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील ६८ न्यायाधीशांच्या पदोन्नती रोखली आहे. (sc bans promotion of judge who sentenced rahul gandhi promotion of 67 more judges stayed)

यात काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या न्यायाधीशांचाही समावेश आहे. या न्यायाधीशांची जिल्हा सत्र न्यायाधीशपदी पदोन्नती करण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टानं आज ६८ न्यायाधीशांच्या पदोन्नतीसाठी काढलेला आदेश रद्द केला आहे. "गुजरात उच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय आणि राज्य सरकारने याबाबत काढलेला आदेश बेकायदेशीर आहे. हा आदेश सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे, असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

SC Bans Promotion of Judge
BJP NEWS : जयंतराव, कर नाही, तर डर कशाला ? ; ED च्या नोटीसवरुन भाजपनं डिवचलं ; भावनिक कार्ड सोडा..

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एमआर शाह आणि न्यायधीश सीटी रविकुमार यांनी गुजरात उच्च न्यायालयाने याबाबत केलेल्या शिफारसी स्थगित केल्या आहेत. "राज्य सरकार या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर आणि न्यायालयाच्या नोटीसनंतर पदोन्नतीचे आदेश काढले आहे," असे शाह आणि रविकुमार यांनी म्हटलं आहे.

उच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशी आणि राज्य सरकारने काढलेला आदेश आम्ही रद्द करीत असून संबधित पदोन्नती केलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळजागी पुन्हा ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी कार्यरत व्हावे, असा आदेश सुप्रीम कोर्टानं काढला आहे.

पदोन्नती ही गुणवत्तेच्या आधारे आणि ज्येष्ठतेनुसार व्हावी, त्यासाठी असलेली परीक्षा पास होणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाची शिफारशीनंतर राज्य सरकारने केलेली पदोन्नती बेकायदेशीर आहे, असे न्यायमूर्ती शाह यांनी सांगितले.

SC Bans Promotion of Judge
Supreme Court : सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टानं उघड केला ; शिंदे -फडणवीसांनी राजीनामा द्यावा ; ठाकरेंचा घणाघात

सुप्रीम कोर्टाने रद्द केलेल्या या पदोन्नतीमध्ये हरीश हसमुख भाई वर्मा हेही आहेत. मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी शिक्षा सुनावण्यात आली होती ही शिक्षा वर्मा यांनी सुनावली होती. "सर्व चोरांचे आडनाव मोदी का?" असे विधान राहुल गांधींनी केले होते. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी गेली.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com