Karnataka Politic's : सिद्धरामय्या, शिवकुमार पुन्हा दिल्लीला रवाना : काँग्रेस हायकमांडशी या मुद्यावर चर्चा करणार

कर्नाटक मंत्रिमंडळाचे मंजूर संख्याबळ 34 असल्याने मंत्रिपदासाठी अनेक इच्छुक आहेत.
Siddaramaiah, D K Shivkumar
Siddaramaiah, D K ShivkumarSarkarnama

बंगळूर : कर्नाटकचे नूतन मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार काही मंत्र्यांसह उद्या (ता. 20 मे) शपथ घेणार आहेत. शपथग्रहण समारंभापूर्वी नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणार्‍या मंत्र्यांची नावे आणि खात्यांच्या वाटपावर हायकमांडशी चर्चा करण्यासाठी सिध्दरामय्या व डी. के. शिवकुमार आज पुन्हा दिल्लीला रवाना झाले. उद्या (ता. 20) होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी ते पक्षाच्या उच्चपदस्थांनाही निमंत्रित करणार आहेत. (Siddaramaiah, Shivakumar left for Delhi again)

काँग्रेस (Congress) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सिद्धरामय्या यांची नेता म्हणून औपचारिकपणे निवड करण्यात आली, त्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे दावा केला. त्यांनी सिद्धरामय्या यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. सिद्धरामय्या आणि शिवकुमार काही मंत्र्यांसह अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी दुपारी 12-30 वाजता बंगळुरच्या कंठीरव स्टेडियमवर शपथ घेतील .

Siddaramaiah, D K Shivkumar
Sameer Wankhede News : वानखेडे भाजपचे कोण लागतात? आरएसएसच्या मुख्यालयात येऊन ते कोणाला भेटले? : पटोलेंचा सवाल

"आम्हाला आमच्या नेत्यांना आमंत्रित करायचे आहे, आम्हाला राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि प्रियंका गांधी यांना समारंभासाठी आमंत्रित करायचे आहे . त्यांनी घाम गाळला, दिशा दिली, म्हणून मला त्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित करायचे होते. नंतर, आम्ही मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा करत आहोत, असे शिवकुमार यांनी दिल्लीत आल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

Siddaramaiah, D K Shivkumar
Pune DPC Meeting : भाजप-शिंदे गटाला किती निधी द्यायचा ते तुम्ही ठरवा; पण आमच्याही निधीचे नियोजन करा : अजितदादांसह विरोधी आमदार आक्रमक

शपथविधीला किती विरोधी नेते उपस्थित राहतील, असे विचारले असता शिवकुमार म्हणाले, "आम्ही आमच्या एआयसीसी अध्यक्षांना काळजी घेण्याची विनंती केली आहे, आमच्यासाठी प्रथम काँग्रेसचे अध्यक्ष आणि गांधी परिवार आहे, आम्ही त्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित करण्यासाठी येथे आलो आहोत.

Siddaramaiah, D K Shivkumar
Congress Leader News : गाडीची स्मशानभूमीत पूजा...२०२३ क्रमांक अन्‌ कर्नाटकात सत्ता : काँग्रेसच्या बड्या नेत्याचा संकल्प अखेर पूर्ण

कर्नाटक मंत्रिमंडळाचे मंजूर संख्याबळ 34 असल्याने मंत्रिपदासाठी अनेक इच्छुक आहेत. जनतेचा आवाज हा कर्नाटक सरकारचा आवाज असेल, असे सांगून शिवकुमार म्हणाले, आपले सर्व राष्ट्रीय नेते शपथविधीसाठी येत आहेत. पहिल्याच दिवशी, पहिल्या मंत्रिमंडळात आम्ही आमच्या सर्व 'हमी'योजना मंजूर करून आम्ही आमचे वचन पाळू. (Karnataka)

आता मंत्रीपदासाठी लॉबिंग

मंत्रिमंडळात सहभाग मिळविण्यासाठी ईच्छुक आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. काँग्रेसचे 40 हून अधिक आमदार दिल्लीत असून त्यांनी मंत्रिपदासाठी हायकमांड स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. पदसिद्ध मुख्यमंत्री सिद्धरामय्या पदसिद्ध उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच मंत्रिपदाचे इच्छुक आमदार दिल्लीत जाऊन मंत्रिपदासाठी काँग्रेसमधील आपल्या गॉडफादरच्या प्रेमात पडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com