Nirmala Sitharaman : अदानी प्रकरणावरून सीतारमन राहुल गांधींवर भडकल्या; म्हणाल्या...

Rahul Gandhi And Adani : केरळ आणि राजस्थान सरकारवर गांधी का बोलत नाहीत?
Rahul Gandhi, Nirmala Sitharaman
Rahul Gandhi, Nirmala SitharamanSarkarnama

BJP vs Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर उद्योगपती गौतम अदानी यांना दिलेल्या लाभावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते काय आहे? अदानी यांच्या कंपन्यामध्ये २० हजार कोटी रुपये कुठून आले? त्याची चौकशी का केली जात नाही? असे प्रश्न गांधी यांनी खासदार असताना लोकसभेत, देशभरातील विविध ठिकाणच्या भाषणात वारंवार उपस्थित केले आहेत. मात्र त्यावर अद्यापही उत्तर मिळाले नसल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.

Rahul Gandhi, Nirmala Sitharaman
Sanjay Jagtap News : दिल्लीत महाराष्ट्राचा आमदार असल्याचे सांगायला लाज वाटते; लोक बॅगा पाहतात : जगतापांनी व्यक्त केली खंत

या प्रश्नांवरून आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी राहुल गांधींचा तीव्र शब्दात समाचार घेतला आहे. तसेच इतर काँग्रेस सरकार असलेल्या राज्यांनी अदानी यांना दिलेल्या गैर फायद्यांवर गांधी बोलत नसल्याची टीकाही त्यांनी केली. त्या बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अदानी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गांधी बिनबुडाचे आरोप करीत आहेत. तशी त्यांना सवय झाल्याची टीका केली.

Rahul Gandhi, Nirmala Sitharaman
Karnataka Election : कुमारस्वामींच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

सीतारामन म्हणाल्या, "आदानी यांच्या कंपन्यांना विना टेंडर काही बंदर दिले. त्यांच्या कंपन्यात २० हजार कोटी गुंतवून अदानींना फायदा करून दिल्याचे राहुल गांधींना वाटते. मात्र त्यात काही तथ्य नाही. राहुल गांधींना पंतप्रधानांवर बिनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वीही असे आरोप केले होते. मात्र अनुभवातून ते काही धडा घेत नाहीत. आताही ते पुन्हा तसेच आरोप करत आहेत."

Rahul Gandhi, Nirmala Sitharaman
Khatav News : पंचायत समितीच्या आवारातच ठेकेदाराचा आत्महत्येचा प्रयत्न...

केरळ सरकारने अदानीला दिलेले गैरफायदे' आणि राजस्थानमधील कंपनीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात गांधींनी आवाज का उठवला नाही, असा सवालही सीतारामन यांनी यावेळी केला. सीतारामन म्हणाल्या, "केरळमधील तत्कालीन काँग्रेस सरकारने अदानीला विझिंजम बंदर दिले होते. त्यासाठी कोणतीही निविदा काढली नव्हती. आता तेथे काँग्रेस सरकार नाही, तर सीपीआय(एम)चे सरकार आहे. पण केरळने तो आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करण्यापासून त्यांना कुणी रोखले? तसेच अदानी यांना राजस्थानमध्ये 'संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्प' देण्यात आला आहे. त्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलत नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com