राजनाथसिंहांवर प्रचार सभेतच नामुष्की; होगी, होगी...म्हणत वेळ मारून नेली!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री प्रचारात व्यस्त आहेत.
Rajnath Singh
Rajnath Singh Sarkarnama

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (UP Election 2022) प्रचार शिगेला पोहचला आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री प्रचारात व्यस्त आहेत. या निवडणुकीत विरोधकांकडून बेरोजगारीचा मुद्दाही मांडला जात आहे. यावरून तरूणांमध्ये असलेल्या रोषाचा सामना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनाच करावा लागला.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) गोंडा येथे प्रचार सभेत बोलताना काही तरूणांनी रोजगार देण्याची मागणी केली. त्यामुळे राजनाथसिंह यांना आपलं भाषण मध्येच थांबवावे लागले. सैन्य भरती सुरू करा, आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा तरूणांकडून केल्या जात होत्या. त्यावर राजनाथसिंह यांनी होगी, होगी, होगी, जरूर होगी, चिंता मत करो! असं उत्तर देत वेळ मारून नेली. यावेळी भाजपच्या (BJP) इतर नेत्यांकडूनही तरूणांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात होता.

Rajnath Singh
गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान! चित्रा वाघ यांच्या मनातलं गाढव कोण?

कोरोनामुळे काही समस्या होत्या, लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल, असंही राजनाथसिंह म्हणाले. त्यानंतर त्यांनी सर्वांना भारत माता की जय म्हणायला लावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे.

सचिन कुमार यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, सैन्य भरती कधी होणार राजनाथसिंहजी. मागील दोन वर्षात १० पेक्षा जास्त राज्यांत निवडणूक होऊ शकते. लाखोंच्या उपस्थितीत सभा होऊ शकतात. नमस्ते ट्रंम्प होऊ शकते. पण भरती होऊ शकत नाही. युवकांची चिंता आहे की, रोजगार न देण्याचे एक कारण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद बॉम्बस्फोटाचा संदर्भ देत सायकलवरून समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. अहमदाबादमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट दहशतवाद्यांनी सायकलचा वापर कसा केला, असा सवाल पंतप्रधानांनी उपस्थित केला. त्यावर सपाचे प्रमुख अखिलेश यादव हा देशाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच सोशल मीडियातही सायकलसह अनेकांनी आपले व पंतप्रधानांचे फोटो शेअर केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com