फडणवीस मुक्कामी असलेल्या हॉटेलात मध्यरात्री काँग्रेस आमदाराच्या एन्ट्रीने खळबळ

आमदाराचा हॉटेलात ये-जा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Aleixo Reginaldo Lourenco
Aleixo Reginaldo LourencoSarkarnama

पणजी : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोव्यातील विधानसभा निवडणुकीमुळे (Goa Assembly Election) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून (BJP) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते मंगळवारी गोव्यात दाखल झाले अन् त्याच रात्री काँग्रेसचे (Congress) प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व आमदाराने त्यांची भेट घेतल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याची चर्चाही यानिमित्तानं रंगली आहे.

गोव्यात सध्या भाजपची सध्या आहे. मागील निवडणुकीनंतर काँग्रेसचे संख्याबळ अधिक असूनही सत्ता स्थापन करता आली नाही. भाजपने मगोपला सोबत घेत सत्ता खेचून आणली. त्यानंतर मागील पाच वर्षांत काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यातच आता एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) यांच्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपने फडणवीस यांना गोव्याचे निवडणूक प्रभारी बनवले आहे.

Aleixo Reginaldo Lourenco
मलिकांनी ट्विट केलं अन् क्रांती रेडकर झाली नि:शब्द!

त्यामुळे फडणवीस यांचे गोव्यातील दौर वाढले आहे. सोमवारी गोव्यात दाखल होताच त्यांनी पहिला धक्का काँग्रेसला देण्यासाठी कंबर कसल्याची चर्चा रंगली आहे. ते मुक्काम असलेल्या हॉटेलात लॉरेन्स यांनी अचानक एन्ट्री केली. त्यानंतर ते काही वेळाने हॉटेलबाहेर गेले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. लॉरेन्स लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

हॉटेलातून बाहेर पडताना लॉरेन्स यांना माध्यमांनी फडणवीसांची भेट घेतल्याबाबत विचारले होते. पण त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता. दरम्यान, मंगळवारी यावरून काँग्रेसमध्येही खळबळ उडाली असून नेत्यांना याचा खुलासा करताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षचं भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेवरून पक्षाला झटका बसला आहे.

'आप'ने लॉरेन्स यांचा याबाबतचा व्हि़डीओ ट्विट केला आहे. काँग्रेसही भाजपची बी टीम असल्याचा आरोपही आपने केला आहे. काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने गोव्याला फसवलं. लॉरेन्स हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारी आहेत, असं आपने म्हटले आहे. त्यामुळे लॉरेन्स यांच्या भाजप प्रवेशावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com