जेव्हा प्रफुल्ल पटेलही बेड मिळवून देऊ शकत नाहीत तेव्हा....

अशा महामारीमध्ये संयम ठेवण्याची गरज आहे. प्रशासन आपल्यासाठी झटते आहे. आपणही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. अशा काळात अफवांचेही पेव फुटते. पण नागरिकांनी अधिकृत माहितीवर विश्‍वास ठेवावा.
Prafull Patel
Prafull Patel

भंडारा : आताशा जरी कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूसंख्या कमी होत असली, तरी मागील काळात स्थिती भयंकर होती. जिकडे तिकडे बेड्स, रेमडेसिव्हिर आणि इतर औषधांचा तुटवडा होता. (There was a shortage of beds, remedies and other medicinesअ) शा स्थितीत १५ दिवसांपूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल (MP Prafull Patel) यांनी दिल्ली येथे एका परिचिताला बेड मिळवून देण्यासाठी फोन केला होता. पण तेव्हा तो मिळू शकला नाही. ‘मी फोन लावूनसुद्धा एका परिचिताला बेड उपलब्ध करून देऊ शकलो नाही.’, (Couldn't make the bed available) अशी खंत खासदार पटेल यांनी व्यक्त केली. 

पत्रकारांशी बोलताना खासदार पटेल म्हणाले, त्यावेळी औषधींचाही मोठा तुटवडा झाला होता. कॉसली झूमा हे इंजेक्शन पाहिजे होते, ते मी चेन्नईवरून मागवून दिले होते. कोरोनामुळे किती दाहक स्थिती निर्माण झाली होती, याचे वास्तव त्यावेळी बघायला मिळाले. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जर बेड व औषधांचा तुटवडा झाल्याची परिस्थिती असेल तर इतर राज्य व शहरांच्या विचार न केलेला बरा, असा प्रश्न दिल्लीतील प्रसंगामुळे उभा राहिला आहे. सुदैवाने कॉसली झूमा हे इंजेक्शन गोंदियाच्या सरकारी आणि खासगी दवाखान्यात उपलब्ध आहे. 

कोरोनाची दुसरी लाट अचानक आली. ती सर्वत्र आली, एकट्या गोंदियातच आली असे नाही. तर देशभर कोरोनाची दहशत माजली आहे. गेले १५-२० दिवस आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी अतिशय वाईट गेले. पण आता स्थिती सुधारत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण, नाही. सरकारने घालून दिलेले निर्बंध पाळा. गर्दी करू नका, मास्कचा वापर करा. असे केल्याने पाहता पाहता आपण कोरोनाला हद्दपार करू शकू, असे खासदार पटेल म्हणाले. 

अशा महामारीमध्ये संयम ठेवण्याची गरज आहे. प्रशासन आपल्यासाठी झटते आहे. आपणही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. अशा काळात अफवांचेही पेव फुटते. पण नागरिकांनी अधिकृत माहितीवर विश्‍वास ठेवावा. आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये जागृती करावी. कोरोनाची थोडीही शंका वाटल्यास ताबडतोब जाऊन चाचणी करून घ्यावी. जेणेकरून वेळेवर उपचार मिळतील आणि स्थिती गंभीर होणार नाही. प्रशासन नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी सज्ज आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com