७० हजाराचा शूज, १ लाखाची पॅंट, आता वानखेडेंचा ड्रेसकोडचीही चर्चा

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर वेगळेच आरोप करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर बोलणारे मलिक आता वनखेडे यांच्या शर्ट, पँटवरही बोलू लागले आहे.
७० हजाराचा शूज, १ लाखाची पॅंट, आता वानखेडेंचा ड्रेसकोडचीही चर्चा
Published on

समीर वानखेडे यांच्या शर्टची किंमत 70 हजार रुपये, पँटची किंमत एक लाखांची तर बुट दोन लाखांचे असते. ते वापरत असलेले घड्याळही काही लाखांचे आहे. ते दररोज नवीन कपडे घालत असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.

जर समीर वानखेडे स्वत: ला प्रामाणिक अधिकारी असल्याचे सांगतात, तर मग एवढ्या प्रामाणिक अधिकाऱ्याकडे 5 ते 10 कोटी रुपयांची कपडे आले कुठून, प्राणामिक अधिकाऱ्यांची जीवनशैली अशी असते का, असे सवालही मलिक यांनी उपस्थित केला आहे.

समीर वानखेडे इतके प्रमाणिक अधिकारी आहे ती, त्यांचा पेहराव आणि राहणीमान जर पाहिलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींहून (PM Narendra Modi) पुढे गेल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

समीर वानखेडे इतके प्रमाणिक अधिकारी आहेत तर त्यांचा पेहराव आणि राहणीमान पाहिलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींहून (PM Narendra Modi) पुढे गेल्याचं दिसेल, असा टोलाही नवाब मलिकांनी लगावला आहे.

समीर वानखेडेंचे सर्व फोटोज पाहा. वानखेडेंचे शूज दोन-दोन लाखांचे, 50 हजारांहून अधिक किमतीचे शर्ट, वापरतात. वानखेडेंचे टी शर्ट पाहिले तर 30 हजारांपासून सुरू होतात. मनगटावरील घड्याळे रोज बदलतात, ही घड्याळेही लाखो रुपयांची आहेत. 20 लाखांपासून 1 कोटी रुपयांचे घड्याळ वानखेडे वापरतात. असा आरोप नवाब मलिक यांनी केल आहे.

जे कपडे ते वापरतात त्याची एकूण किंमत करोडोंच्या घरात आहे. यापेक्षा अधिक प्रामाणिक कुणी असू शकत नाही जो लाखोंचे कपडे, शूज वापरतो असंही नवाब मलिक म्हणाले.

७० हजारांचे शर्ट, ५० हजारांची पतलून, 30 हजारांचे टी शर्ट, 20 लाखांची घड्याळे घालणारा यांच्याइतका इमानदार कोणीही नसेल. वानखेडेंनी हजारो करोडोंची वसूली करुन मिळवलेल्या गैरव्यहारांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी नवाब मलिकांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com