मान यांनी कधीकाळी 'लाफ्टर चॅलेंज' आणि आज थेट मुख्यमंत्रीपदाचीच खुर्ची जिंकली...

आम आदमी पार्टी (AAP) ने आज पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला असून भगवंत मान पुढील मुख्यमंत्री होणार आहेत...
Bhagwant Mann
Bhagwant MannSarkarnama
Bhagwant Mann
Bhagwant Mann

17 ऑक्टोबर 1973 रोजी भारतातील पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात भगवंत मान यांचा जन्म झाला. तेथीलच एसयूएस सरकारी महाविद्यालयातून त्यांनी बी. कॉम (प्रथम वर्ष) केले आहे.

Bhagwant Mann
Bhagwant Mann

आम आदमी पार्टीचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांनी संगरूरमधून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. लोकसभेत `आप`चे एकमेव खासदार आहेत.

Bhagwant Mann
Bhagwant Mann

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी 'आम आदमी पार्टी'मध्ये प्रवेश केला. त्यांच्या शैलीमुळे ते माळवा प्रदेशासह संपूर्ण पंजाबमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पंजाबमध्ये बहुसंख्येने असलेल्या जाट समुदायाचे ते नेते आहेत.

Bhagwant Mann
Bhagwant Mann

भगवंत मान यांची स्पष्ट प्रतिमा आणि बोलण्याची शैली ही त्यांची ताकद आहे. मात्र विरोधक त्यांना नेहमीच अननुभवी म्हणतात आणि त्यांच्यावर दारूच्या व्यसनाचा आरोपही करत असतात.

Bhagwant Mann
Bhagwant Mann

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला १३ जानेवारीला राज्यातील जनतेने मुख्यमंत्री पदासाठी पात्र उमेदवाराचे नाव सांगण्याचे आवाहन केले होते. यासाठी मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला.

Bhagwant Mann
Bhagwant Mann

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी जनतेला व्हॉइस मेसेज आणि एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि कॉलद्वारे मत मांडण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यात पक्षाच्या बाजूने जवळपास 22 लाख मते मिळाली. खरंतर केजरीवाल यांना भगवंत मान यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित करू इच्छित होते. मात्र भगवंत मान यांनी हा निर्णय पंजाबच्या जनतेवर सोडण्याचा आग्रह धरला होता.

Bhagwant Mann
Bhagwant Mann

भगवंत मान हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. ज्यांनी `द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज,` आणि `काॅमेडी नाईट विथ कपिल शर्मा`, या टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता. तिथे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. भगवंत मान यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा चित्रपटसृष्टीकडे वळवला. 'कचहरी' चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यांनी 12 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

Bhagwant Mann
Bhagwant Mann

यानंतर भगवंत राजकारणाकडे वळाले आणि त्यांनी पीपल्स पार्टी ऑफ पंजाब सोडून मार्च 2014 मध्ये आप'मध्ये प्रवेश केला. 2014 पासून ते लोकसभेचे सदस्य आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com