शहादा : एकेकाळी काँग्रेसच्या गड असलेल्या शहादा तालुक्यात विधानसभेच्या निवडणुका वेळी काँग्रेस पक्षाला नेतृत्व नसल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शहादा तालुक्याला अभिजीत पाटील यांच्या रूपाने पुन्हा युवा नेतृत्व लाभल्याने काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त होत आहे.
या निवडणुकीत तालुक्यात काँग्रेसची एकाकी खिंड लढवत गटात 5 तर गणांमध्ये 12 जागांवर यश प्राप्त केले.
शहादा तालुका आणि काँग्रेस यांचे नाते पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे तालुक्यात आजही काँग्रेस विचारसरणीचे लोक आहेत. मध्यंतरी राज्यभरात पक्षांतराची लाट आली होती. त्यात तालुक्यातील अनेक दिग्गजांनी काँग्रेस सोडली. त्यामुळे पक्षाला तालुक्यात प्रभावी नेतृत्व न्हवते परिणामी कार्यकर्त्यांची अवस्था दयनीय झाली होती.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अभिजीत पाटील यांना संधी मिळाली. श्री पाटील यापूर्वी गटातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते आत्ताही पुन्हा मसावत गटातून काँग्रेसच्या तिकिटावर प्रचंड मताधिक्क्याने दिग्गजांचा पराभव करत यश प्राप्त केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पालकमंत्री के सी पाडवी माजी मंत्री पद्माकर वळवी शिरीष नाईक सर्वांनी एकत्र येऊन अभिजित पाटील यांच्याकडे त्याचे नेतृत्व सोपवले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.