ही वाघीण विधानसभेला तुमच्यासमोर येणारच आहे : आशा बुचके

ही वाघीण विधानसभेला तुमच्यासमोर येणारच आहे : आशा बुचके

आळेफाटा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा सुरु झाला असून, ही विधानसभेची रंगीत तालीम आहे. ही वाघीण विधानसभेला तुमच्यासमोर येणारच आहे. या ठिकाणी पुढच्या वर्षी तुम्ही आमदार म्हणूनच स्वागत कराल, ' अशी भूमिका जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेत्या आशा बुचके यांनी उंचखडक (राजुरी, ता. जुन्नर) येथे बोलताना जाहीरपणे मांडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी, नुकतेच मोठे शक्तिप्रदर्शन करत मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना गटनेत्या आशा बुचके तीव्र नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर बुचके यांनी सूचक वक्तव्य करत इशारा दिला आहे.

त्या म्हणाल्या की एकीकडे यात्रांत कुस्त्यांचा तर दुसरीकडे राजकीय आखाडा सुरु आहे. लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम आहे. यासाठी गेली २० वर्षे खस्ता खाल्ल्या आहेत. जिल्ह्यासह तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केलेले आहे. आपण मला वाघीण तसेच रणरागिणी म्हणता आहात. ही वाघीण विधानसभेला तुमच्यासमोर येणारच आहे. याठिकाणी पुढच्या वर्षी तुम्ही आमदार म्हणून स्वागत कराल.

कुस्तीच्या आखाड्यात पहिलवान मानाची ढाल मिळविण्यासाठी लढतो. ज्याला बक्षीस मिळाले नाही तो चंग बांधून सराव करतो, तो सराव आमचा चालू आहे आम्ही कुठेही कमी नाही, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाविषयी त्यांनी चकार शब्दही काढला नाही. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची भूमिका ठामपणे मांडल्याने, आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्या अजूनही तीव्र नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com