मतदानानंतर १६ महिन्यांनी निकाल लागलेली  'ही' आगळीवेगळी निवडणूक!

मतदानानंतर १६ महिन्यांनी निकाल लागलेली  'ही' आगळीवेगळी निवडणूक!

खामगाव : निवडणूक कोणतीही असो, मतदानाचा हक्क बजावल्या नंतर निकलाची उत्सकता लागलेली असते. साधारणपणे एक महिन्याच्या आत कोणत्याही निवडणुकीचा निकाल कळतो. मात्र महाराष्ट्र राज्यात अशी एक आगळी वेगळी निवडणूक होते, तिच्या निकाल करिता अनेक महिने वाट पहावी लागते.

यावर्षी सुध्दा मतदान झाल्यावर तब्बल १६ महिन्यानंतर या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा बार कोन्सिलची निवडणूक २८  मार्च २०१८ रोजी मतदान झाले. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र आणि गोव्यातील ९० हजार वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. बार कौन्सिलसाठी २५ संचालक पदासाठी १६४ वकील उमेदवार होते. पसंती कर्मानुसार  मतदानाची प्रक्रिया २० एप्रिल २०१८ पार पडली. तब्बल ४ महीने  निवडणुकीची मतमोजणी चालली.

एका मतदाराला २५ मते देण्याचा अधिकार होता. त्यामुळे मतमोजणीस वेळ लागला. त्यांननंतर सुद्धा आक्षेप, दावे, हरकती असे प्रकार झाले.  उच्च व सर्वोच्च न्यायालयातही काहीनी धाव घेतली.  इतकी सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर २२ जुलै रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार कोन्सिलच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. वकिलांना सनद देणे आणि रद्द करणे, तक्रारीवर न्याय निर्वाळा करणे हे काम बार कोन्सिलचे काम आहे. त्यामुळे विधी क्षेत्रात बार कोन्सिलचे महत्त्वाचे स्थान आहे.

संचालकात अकोल्याचे ऍड. मोहता

महाराष्ट्र आणि गोवा बार कोन्सिलवर २५ संचालक निवडल्या गेले आहेत. त्यामध्ये आशिष देशमुख, गजाजन चव्हाण, विठ्ठल, विशाल कोंडे देशमुख , पारिजात पांडे, राजेंद्र उमाप, जयंत जायभाये, हर्षद निबांळकर, अविनाश आव्हाड, संग्राम देसाई, वसंत साळुंखे, विवेकानंद घाटे, मोतीसिंग मोहता, अण्णाराव पाटील, आसिफ कुरेशी,  उदय वारुंजीकर, मिलिंद पाटील, मिलिंद तोबडे, अनिल गोवारडीपे, सतीश देशमुख, अमोल सावंत, अविनाश भिडे, सुभाष घाडगे, सुदीप पसबोला, वसंत भोसले व  अहमदखान पठाण यांचा समावेश आहे. 

महाराष्ट्र आणि गोवा बार कोन्सिल निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून विभागावार संचालक निवडल्या गेले आहेत. आता कामकाजात गती येईल. वकील बांधवांना बार कोन्सिल कडील कामासाठी मुंबई जावे लागणार नसून आपल्या भागातील संचालकाकडे कामे होणार असल्याने गैरसोय टळणार आहे, असे वकिल रमेश भट्टड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com