भाजप तालुकाध्यक्षाने महिला पदाधिकाऱ्याला पाठविली अश्लील क्लिप : विनयभंगाचा गुन्हा

भाजप तालुकाध्यक्षाने महिला पदाधिकाऱ्याला पाठविली अश्लील क्लिप : विनयभंगाचा गुन्हा

पिंपरी ः भाजपच्या भोर-वेल्हा तालुका अध्यक्षाने पिंपरी चिंचवड भाजप महिला मोर्चाच्या शहर उपध्यक्षाला अश्लिल व्हिडीओ पाठवून विनयभंग केला. ही घटना मागील दोन आठवड्यांपूर्वी घडली.

याप्रकरणी संबधित महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार भाजप भोर-वेल्हा तालुका अध्यक्ष आनंद देशमाने याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमाने हा वेल्हा तालुक्याचे भजपचे तालुका अध्यक्ष आहे. पीडित महिला पदाधिकारीसोबत आरोपीची मागील तीन वर्षांपूर्वी एका सामाजीक कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी देशमाने याने पीडित महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता.

गेल्या दोन आठवड्यांपासून देशमाने हा महिलेच्या व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठवत होता. महिलेने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार येणाऱ्या मेसेजला कंटाळलेल्या महिलेने रविवारी (फी. 28) रात्री प्रतिसाद दिला असता आरोपीने त्यांना अश्लील व्हिडिओ पाठवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com