करमाळ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बागल गटाची भाजपशी जवळीक 

पक्षनिष्ठेपेक्षा फक्त गटावरच चलणाऱ्या करमाळा तालुक्‍यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, तशी तालुक्‍यातील गटांची राजकीय आराखडे बांधायला सुरूवात केल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
करमाळ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बागल गटाची भाजपशी जवळीक 

सोलापूर : पक्षनिष्ठेपेक्षा फक्त गटावरच चलणाऱ्या करमाळा तालुक्‍यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, तशी तालुक्‍यातील गटांची राजकीय आराखडे बांधायला सुरूवात केल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. 

करमाळा तालुक्‍यातील बागल गटाने मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहणे पसंत केलेले आहे. पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस असला तरी तालुक्‍यात बागल गट म्हणूनच ताकद ठेवलेली आहे. 

यावेळेस सत्तांतर झाले आणि राज्यात भाजपची सत्ता आली. बागल यांना करमाळ्यात विधानसभेसाठी पराभव पत्करावा लागला. सत्ता नसल्यामुळे बागल गटाच्या ताब्यात असलेल्या आदिनाथ आणि मकाई कारखान्याला आर्थिक मदत व्हावी यासाठी; तसेच भविष्यात भाजपकडून विधानसभेसाठी काही करता येईल का अशी महत्वाकांक्षा ठेऊन बागल गट हे भाजपच्या जवळ गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

बागल गटाच्या ताब्यात असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि मकाई सहकारी साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची मोळी भाजपच्या अविनाश महागावकर यांच्या हस्ते टाकण्यात आली. भाजपचे अविनाश महागावकर हे राज्य शिखर बॅंकेवर संचालक म्हणून आहेत. महागावकर यांनी आदिनाथ आणि मकाई या दोन साखऱ कारखान्यांना राज्य शिखर बॅंकेतून आर्थिक मदत केली आहे. भाजपाच्या अविनाश महागावकर यांनी आर्थिक मदत केल्यामुळे बागल गटाने महागावकर यांच्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम घेतला. 

भविष्यकाळात करमाळ्याच्या राजकारणात बागल गट भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू झालेत की काय, असे सध्या वातावरण आहे. अविनाश महागावकर हे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत. 

येत्या काळात माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्यासाठी बागल गटासारखा तगडा गट जर भाजपाच्य हाताला लागला तर भाजपाची ताकत देखील वाढणार आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीत अवघ्या अडीचशे मतांनी बागलांचा पराभव झालेला आहे. करमाळ्यातून विधानसभेसाठी निवडूण येणारी खात्रीशिर जागा म्हणून भाजप बागल गटाकडे पाहत असावे, अशी चर्चा सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com