कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक : आजी-माजी आमदारांची गोची 

* मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : 478-मतदान : 14 ऑक्‍टोबर-मतमोजणी :16 ऑक्‍टोबर-निवडणूक निकाल : 17 ऑक्‍टोबर-नामनिर्देशन कालावधी : 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर( सकाळी 11.00 ते 4.30)-नामनिर्देश पत्र छाननी : 3 ऑक्‍टोबर ( सकाळी 11 पासून छाननी संपेपर्यंत )-नामनिर्देशन पत्र मागे घेणेचा कालावधी : 5 ऑक्‍टोबर ( दुपारी 3 पर्यंत )-निवडणूकसाठी चिन्ह देणे व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे5 ऑक्‍टोबर (दुपारी 3 नंतर)
 कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक : आजी-माजी आमदारांची गोची 

कोल्हापूर   : जिल्ह्यातील 478 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. यावर्षीपासून थेट जनतेतूनच सरपंच निवडला जाणार असल्याने गावागावातील स्वंयघोषित समाजसेवक आतापासूनच कामाला लागले आहे.

तर, गावपातळीवरील गट-तट आणि भाऊ बंदकीचा विचार करून पॅनेल कसे व कोणा-कोणाचे करायचे याच सुत्रबध्द नियोजन सुरू झाले आहे, यामध्ये विद्यमान आणि माजी आमदारांना कोणाची बाजु घेवून निवडणूकीत उतरायचे ही गोची होणार आहे. 

जिल्ह्यातील सुमारे 478 ग्रामपंचयतींसाठी 14 ऑक्‍टोबरला मतदान व 16 ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. यातून 4 हजार 390 सदस्य निवडले जाणार आहे. भाजपच्या सत्तेनंतर जिल्ह्यात दुसऱ्यांदा ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. दरम्यान, गेल्या अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायतींमध्ये आपली सत्ता असली पाहिजे, हा एकच नारा भाजपने आळवला आहे. 

त्याला आता सत्यात उतरण्यासाठी गावपातळीवर भाजपचे कायमस्वरूपी फलक लावणे, शाखा काढण्याचे कामांनी गती घेतली आहे. दरम्यान, सत्ता कोणाचीही आली तरीही सरपंच हा थेट जनतेतूनच निवडायचा आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणूकीला विशेष महत्व आहे. वास्तविक ग्रामपंचायत कोणत्या गटाकडे राहते, यावरही आमदारकीच्या निवडणूकीचे अंदाज बांधले जातात. ज्या पक्षाचा किंवा नेत्याची जास्ती-जास्त गावात सत्ता येते त्या ठिकाणी संबधीत आमदार, खासदाराला भविष्यातील राजकारण करणे सोयीचे आणि सोपे ठरते. 

तरीही एखाद्या गावात कोणाच्या गटाकडून आपली भूमिका मांडायची हे विद्यमान आमदारांना कसरतीचे ठरू शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विद्यमान किंवा माजी आमदारांना कोणाच्या बाजुने उभे राहयचे हे मोठे संकट ओढवलेले असते. जिल्हातील सर्वच तालुक्‍यात हिच परिस्थिती असल्याने जे काही गट-तट किंवा भाऊबंद ठरवतात तेच होवू दे म्हणून आमदार, खासदारांना यापासून अलिप्त राहव लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com