करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांची इनोव्हा वादात!

करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांची इनोव्हा वादात!

पुणे : माढा-करमळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी गेल्या पाच वर्षापासून माझ्या नावावर असलेली इनोव्हा गाडी दरमहा ४०,००० रुपये मासिक भाड्याने गाडी घेऊन एक रुपयाही दिला नाही, असा आरोप सांगोल्याचे रहिवाशी सतिश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन आज केला.

आमदारांनी थकवलेली रक्कम सुमारे २४ लाखापेक्षा अधिक आहे. तसेच आमदारांकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. पुणे पत्रकार संघात त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. 

याप्रकरणी आमदार नारायण पाटील यांनी सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत इनोव्हा गाडी माझ्या वाढदिवसानिमित्त भेट दिली असल्याचे सांगितले आहे.

सूर्यवंशी यांनी याबाबत करमाळा पोलिस ठाण्यातही अर्ज केला आहे. आमदार पाटील हे वापरत असलेली इनोव्हा गाडी व त्याचे भाडे परत करण्यासाठी यात उल्लेख केला आहे. तसेच ही गाडी त्यांच्या पत्नीच्या नावे होती. तरीही ती परत मिळत नसल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी केली आहे.

ही गाडी आमदारांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आॅगस्ट २०१३ मध्ये देण्यात आली होती. `नारायण आबांचा निष्ठावंत कार्यकर्ता "संजय परदेशी" व "नारायण आबा पाटील मिञमंडळ करमाळा` यांच्याकडून ही गाडी वाढदिवसाला भेट दिलेली आहे. त्या वेळी सूर्यवंशी हे आमदार नारायण आबा पाटील मिञमंडळाचा तालुका अध्यक्ष होते, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मर्सिडीस वरून असाच वाद झाला होता. ते लोण आता करमाळा तालुक्यातही पोचले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com