झोपडपट्टीधारकांच्या मदतीला  धावल्या राष्ट्रवादीच्या रणरागिणी 

झोपडपट्टीधारकांच्या मदतीला  धावल्या राष्ट्रवादीच्या रणरागिणी 


झोपडपट्टीधारकांच्या मदतीला 
धावल्या राष्ट्रवादीच्या रणरागिणी 

संजीव भागवत ः सरकारनामा ब्युरो 

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पूर्वी झोपडट्टीच्या सुरक्षेसाठी मोठी आश्‍वासने देणाऱ्या मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने गेल्या काही दिवसांत मुंबईत अनेक ठिकाणी गोरगरीबांच्या झोपड्यांवर बुलडोझर फिरवत त्या उद्‌ध्वस्त केल्या आहेत. कफ परेड परिसरात मागील अनेक वर्षांपासून असलेल्या मच्छिमार कामगारांच्या झोपडया नियमात असताना देखील त्यांना कोणतीच पूर्व कल्पना देता त्या पाडण्यात आल्याने या कामगारांच्या मदतीला मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रणरागिणी धावून आल्या. 

ज्या झोपडया वैध आहेत, त्यांच्यावर कारवाई करून असंख्य गोरगरीबांच्या झोपडया महापालिकेने उद्‌ध्वस्त केल्याने याविरोधात आता महापालिका आणि सत्ताधारी सेनेच्या विरोधात रस्त्यावर उतरणाचा निर्धार मुंबई महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली. यावेळी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा पुष्पा हरियाण, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्षा सुरैना मल्होत्रा, कुलाबा तालुका अध्यक्षा प्रियंका चोरगे उपस्थित होत्या. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, साधू टी. एल. वासवानी मार्ग कफ परेड कुलाबा ( कफ परेड पोलिस स्टेशन जवळ ) ट्रांसिट कॅम्प 36 नं ब्लिडिंग जवळ असलेल्या बंजारा समाजाच्या मच्छिमार कामगारांसोबतच इतर कष्टकरी कामगारांच्या झोपडया जमिनदोस्त करण्यात आल्या आहेत.. या झोपडपट्टीवासीयांची महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची आणि नुकसानीची माहिती घेतली. अनेकांकडे पुरावे असताना देखील त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली ? असा सवाल यावेळी सुरेखा पेडणेकर यांनी केला. त्या म्हणाल्या, ""अनेक वर्षा पासून अस्तित्वात असलेली झोपडपट्टी स्थानिक नगरसेवक यांनी सर्वाना कारवाही करण्याआधी घरांचे पुरावे घेऊन बाहेर बोलावले आणि कोर्टाची नोटीस आहे सांगून सर्व घरे फसवून तोडण्यात आली. ऐन पावसाळ्या तोंडावर असताना, मुलांची शाळा चालू होण्यापूर्वी लाईट, पाणी चालू असताना कोणत्याही प्रकारची नोटिस किंवा कोणतीही पूर्व सूचना न देता यांच्या वर कार्यवाही करण्यात आली आहे.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com