गृह मंत्रालयाच्या सुचनांनंतर अवैध व्यवसायांवर पोलिसांकडून कारवाई

गृह मंत्रालयाने राज्यातील सर्व अवैध व्यवसाय त्वरीत मोडकळीस काढण्याचा सूचना राज्याच्या पोलिस महासंचालकांसह प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाला केली आहे. यामुळे नाईलाजस्तव पोलिस प्रशासनाकडून अवैध व्यवसायांवर कारवाईचे चित्र शहरातून उमटविले जात आहे
Police Started Action Aginst Illegal Busiess in Dhule
Police Started Action Aginst Illegal Busiess in Dhule

धुळे  : राज्यासह जिल्ह्यातील अवैध व्यवसाय तेजीत सुरू असल्याने त्याचा थेट परिणाम राज्य शासनाच्या महसूल उत्पन्नावर होत आहे. हा धागा पकडून नवी दिल्लीस्थित लॉटरी युनियन बोर्डने गृह मंत्रालयाकडे राज्यातील अवैध व्यवसायांबाबत तक्रार केली आहे. तर गृह मंत्रालयाने राज्यातील सर्व अवैध व्यवसाय त्वरीत मोडकळीस काढण्याचा सूचना राज्याच्या पोलिस महासंचालकांसह प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाला केली आहे. यामुळे नाईलाजस्तव पोलिस प्रशासनाकडून अवैध व्यवसायांवर कारवाईचे चित्र शहरातून उमटविले जात आहे.

शहरासह जिल्ह्यात सट्टा, मटका यासह विविध अवैध व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याने अनेक भागात अवैध व्यवसायांचा बोलबाला राहिला असून आर्थिक परिस्थिती ढवळून निघाली आहे. तसे पाहिले तर राज्याची ऑनलाईन लॉटरी नाही, पंरतु बाहेरील राज्यांची ऑनलाईन लॉटरी सुरू आहे. त्यातून मिळणाऱ्या महसुलात गेल्या काही महिन्यात मोठी घट झाली आहे. राज्यात अवैध पध्दतीने सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच नवी दिल्लीस्थित ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड ऍण्ड ऍलॉय इंडास्ट्री यांनी राज्यात जीएसटी लागू झाल्यामुळे लॉटरी उद्योगाला मोठया प्रमाणात कोटयावधी इतकी रक्‍कम मोजावी लागत आहे. 

यातच राज्यासह जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून अवैध व्यवसायांवर असलेली मेहेरनजर यातून अवैध व्यवसायाला मिळालेले बळ त्याचे चित्र आहे. तीच री-ओढून नवी दिल्ली येथील लॉटरी इंड स्ट्रीने उघोग डबघाईला आला असुन राज्यात सूरू असलेल्या अवैध जुगार व सट्टा यासारख्या अवैध व्यवसायांमुळे शासनाच्या महसुलात घट झाला आहे. शिवाय लॉटरीच्या महसुलातून वाढलेली रक्‍कम पोलिस दलाच्या गृह निर्माणासाठी वापरण्यात देखील येणार आहे. राज्याचा गृहमंत्रालयाने काढलेल्या एका पत्रकानुसार राज्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना अवैध व्यवसाय मोडकळीस काढण्याबाबत सक्‍त कारवाईची सूचना दिल्या आहेत.

नाईलाजस्तव अवैध व्यवसायांवर कुऱ्हाड

राज्याचा गृहमंत्रालयाने काढलेल्या पत्रकानुसार राज्यासह जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून अवैध व्यवसायांची माहिती संकलित केली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यासह शहरातील विविध पोलिस ठाणेकडून राजरोसपणे चालणारा सट्टा, मटका जुगार अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात असल्याचे माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com