पृथ्वीराजबाबा विटा पालिकेत; सदाशिवराव पाटलांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक! 

पृथ्वीराजबाबा विटा पालिकेत; सदाशिवराव पाटलांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक! 

विटा (सांगली) : कॉंग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असताना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विटा नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली.

निमित्त सदिच्छा भेटीचे असले तरी सदाभाऊंचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आले असावेत? अशी चर्चा रंगली आहे. या भेटीत पृथ्वीराज चव्हाण यांनी सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील या पितापुत्राशी अँटीचेम्बरमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा केली. 

गेल्या काही दिवसांपासून सदाशिवराव पाटील हे कॉंग्रेस पक्षावर नाराज आहेत. कदम गटाच्या खानापूर तालुक्‍यातील राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते कॉंग्रेसच्या पक्षीय कार्यक्रमापासून अलिप्त होते.

अलीकडेच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसेच गेल्या काही दिवसापूर्वी विटा पालिकेत झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे खासदार संजयकाका पाटील, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख यांच्यासमवेत उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या वाटेवर असणाऱ्या सदाभाऊंचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यासाठी तरी चव्हाण होते की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान या भेटीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता केवळ विटा नगरपालिकेस सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. तरी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि प्रमुख कार्यकर्त्याची लक्षणीय उपस्थिती बरेच काही सांगून जात होते. त्यामुळे या सदिच्छा भेटीला खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीने राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com