साखरेला शून्य टक्‍क्‍याने कर्जपूरवठा करावा - संजयमामा शिंदे 

ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत-जास्त दर द्यायचा असेल तर शेतकऱ्यांच्या उत्पादित होणाऱ्या साखरेवर शून्य टक्के व्याजदराने शासनाने पतपूरवठा करण्याची मागणी विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी केली आहे.
साखरेला शून्य टक्‍क्‍याने कर्जपूरवठा करावा - संजयमामा शिंदे 

सोलापूर : ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत-जास्त दर द्यायचा असेल तर शेतकऱ्यांच्या उत्पादित होणाऱ्या साखरेवर शून्य टक्के व्याजदराने शासनाने पतपूरवठा करण्याची मागणी विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी केली आहे. 

माढा तालूक्‍यातील म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशनच्या 10 व्या गळीत हंगामाच्या उसाची मोळी टाकण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन संजय मामा शिंदे यांनी शून्य दराची मागणी केली. 

ते म्हणाले, की साखर हा शेतीमाल आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने नाबार्डच्या माध्यमातून किंवा राष्ट्रीय बॅंकाच्या माध्यमातून साखर तारण ठेऊन शून्य टक्‍क्‍याने कर्ज पूरवठा करणे हे गरजेचे आहे. उसाला पहिली उचल देण्यासाठी साखर तारण ठेऊन कर्ज घ्यावे लागते. तारण ठेवलेल्या साखरेला बॅंका व्यावसायिक पद्धतीने कर्जपूरवठा करतात. तारण साखरेला 8 ते 12 टक्‍क्‍यांपर्यंत बॅंका व्याज घेत असल्यामुळे महिन्याला एका क्विंटलला पोत्याला 30 ते 35 रूपये हा व्याजाचा बोजा पडतो. वर्षभरासाठी साखरेच्या एका क्विंटला 300 ते 350 रूपये फक्त व्याज द्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॅंकाना व्याज द्यावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळणे अवघड होत चालले आहे. त्यामुळेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने साखरेला तारण ठेऊन शून्य टक्के दराने कर्ज पूरवठा करणे आत्यावश्‍यक झालेले आहे. 

शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा यासाठी सरकारने सी. रंगराजन कमिटीची स्थापना केली होती. त्या कमिटीच्या शिफारसीनूसार 70 : 30 चा राम्यूला स्विकारण्यात आलेला आहे. उत्पादित झालेल्या साखऱेला जेवढा दर मिळतो, त्यापैकी 70 टक्के रक्कम ही शेतकऱ्याला द्यायची आणि 30 टक्के रक्कम ही साखर कारखान्यांनी घ्यायची ही शिफारस सी. रंगराजन समितीने केलीली आहे आणि सरकारने ती स्वीकारलेलीदेखील आहे. तशाच पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांची असलेली 70 टक्के साखरेवर शून्य टक्के दराने कर्ज पूरवठा करावा आणि उरलेल्या 30 टक्के साखरेला व्यावसायिक दराने कर्ज घ्यायला कारखानदार तयार असल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले. 

सी. रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे जर सरकारने साखरेवर शून्य टक्के दराने कर्जपूरवठा केला तर साखर तारण ठेऊन त्याला द्यावे लागणारे 300 ते 350 रूपये कर्ज हे वाचेल आणि शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव देता येईल. उसापासून तयार झालेली साखर ही शेतीमाल आहे त्यामुळे या शेतीमालावर शून्य टक्के दराने कर्जपूरवठा करावा आणि सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनूसार 70 : 30 चा फार्म्यूला कर्जासाठी स्विकारावा अशी मागणीही संजय मामा शिंदे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com