मुंबई बाजार समितीसाठी सोमनाथ आवताडेंच्या अर्जामुळे खळबळ

राज्यातील सर्वात मोठी बाजार समिती असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पुणे महसूल विभागातून संचालक पदासाठी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सोमनाथ आवताडे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे खळबळ उडाली
Somnath Awtade Fills Mumbai Market Committe Election Form
Somnath Awtade Fills Mumbai Market Committe Election Form

मंगळवेढा : राज्यातील सर्वात मोठी बाजार समिती असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पुणे महसूल विभागातून संचालक पदासाठी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सोमनाथ आवताडे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे खळबळ उडाली.

मंगळवेढ्याचे सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात खरेदी विक्री संघ, कृषी उद्योग संघ,कृषी उत्पन्न बाजार समिती व श्री संत दामाजी साखर कारखान्यासह तालुक्यातील अनेक सहकारी  संस्था आवताडेंच्या ताब्यात आहेत. त्यामुळे तालुक्यापुरते मर्यादित असलेले आवताडे यांचे राजकीय वर्चस्व या मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्याबाहेर जात आहे.  

पुणे महसूल विभागातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी यामध्ये संस्था मतदारसंघातील 11 ग्रामपंचायत मतदारसंघातील 4 अशा 40 कृषी उत्पन्न बाजार समितीमधील  601 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वात कमी वयात अध्यक्षपदी भूषवलेल्या सोमनाथ आवताडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत नवनवीन प्रयोग सुरू करून कांदे, डाळिंब,मका,हरभरा याचे हमीभाव केंद्र सुरू केले. तर चोखामेळा नगर व दामाजी नगर या भागातील बाजारकरूची गैरसोय दूर करावी म्हणून नुकताच त्यांनी या भागात आठवडा बाजार सुरू केला आहे.

कमी वयात सहकार क्षेत्रात यांनी झेप घेतली आहे. परंतु त्यांची झेप मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्याचे लक्ष लागले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com