संजयकाका पाटील हे एकमेव धडाडीचे नेते; कॉंग्रेस नेत्याची स्तुतीसुमने! 

संजयकाका पाटील हे एकमेव धडाडीचे नेते; कॉंग्रेस नेत्याची स्तुतीसुमने! 

विटा (सांगली) : "खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करून अंदाजपत्रकामध्ये 1200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच टेंभू योजना पूर्णत्वाकडे निघाली आहे संजयकाका हेच जिल्ह्यात एकमेव धडाडीचे नेते आहेत. तेच टेंभू योजना पूर्ण करू शकतील', अशा शब्दांत कॉंग्रेस नेते आणि विटा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव पाटील यांनी स्तुतीसुमने उधळली आहे. 

वैभव पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, खासदार संजयकाका पाटील यांनी खानापूर तालुक्‍यातील नूतन सरपंच आणि सदस्य यांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी खानापूर तालुक्‍यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत टेंभूचे पाणी 2019 पर्यंत देणार असल्याचे सांगितले होते. यानंतर 8 नोव्हेबर 2017 रोजी सांगली येथे पाटबंधारे कार्यालयात खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी टेंभू व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये सुचवलेली कामे ही लवकरच मार्गी लागणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com