अजितदादा म्हणतात फिफ्टी-फिफ्टी

आगामी निवडणुका मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचा निर्णय झाला आहे .जागा वाटपा संबधी काँग्रेसशी बोलणी सुरू आहेत. या मध्ये 50/50 फर्म्युल्याची आमची मागणी असेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Ajit Pawar
Ajit Pawar

कोल्हापूर : आगामी निवडणुका मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचा निर्णय झाला आहे .जागा वाटपा संबधी काँग्रेसशी बोलणी सुरू आहेत. या मध्ये 50/50 फर्म्युल्याची आमची मागणी असेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पवार म्हणाले, "जागा वाटपासाठी बोलणी सुरू झाली आहेत. येत्या दोन तारखेला पुन्हा एक बैठक होणार आहे.या मध्ये जागा वाटपा सोबतच कोण कोणते समविचारी पक्ष आपल्या सोबत येतील यावर विचार होईल. मित्र पक्षांना सोडून उरलेल्या जागा मध्ये 50/50 फॉर्म्युलाच्याची आमची मागणी असेल.'' 

"जागा वाटपावर लवकर निर्णय घेण्याचाही प्रयत्न आहे. संबंधित उमेदवारांना तयारीसाठी किमान एक महिना मिळावा असा प्रयत्न असेल. आयत्या वेळी निर्णय झाल्याने नुकसान झाल्याचा मागच्या काही निवडणुकांमधील अनुभव आहे. त्यामुळे यावेळी लवकर आघाडीचे जागा वाटप होईल," असे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com