कऱ्हाड : भाजपला बहुमत नव्हते म्हणुन त्यांनी सरकार बनवले नाही. त्यांनी राज्यपालांना सुरुवातील जावुन आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही सरकार बनवु शकत नाही असे लेखी दिले आणि आता त्यांनी सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँंग्रेसचा उल्लेख केलेला असावा असे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यक्तीगत दोन-तीन लोक गेले असतील. मात्र पक्षाचा पाठिंबा त्यांना नाही. त्यामुळे पक्ष म्हणुन आम्ही त्यामध्ये सहभागी नाही. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचेच सरकार येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे आहे असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे केला.
जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनाठी आल्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत श्री.पवार बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज पदाची सुत्रे स्विकारणार त्यावर श्री. पवार म्हणाले, ''शपथ घेतल्यानंतर सुत्र ही स्विकारायची असतात. मात्र ही निवड वैध आहे की नाही हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र घटनेनुसार त्याला पाठिंबा लागतो तो पुरेसा आहे की नाही हे राज्यपालांनी ३० तारखेपुर्वी बहुमत स्पष्ट करायचे असल्याने नजरेसमोर येईल.''
ते पुढे म्हणाले, ''भाजपला बहुमत नव्हते म्हणुन त्यांनी सरकार बनवले नाही. त्यांनी राज्यपालांना सुरुवातील जावुन आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही सरकार बनवु शकत नाही असे लेखी दिले आणि आता त्यांनी सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केलेला असावा असे दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका सुरु आहेत. व्यक्तीगत दोन-तीन लोक गेले असतील. मात्र पक्षाचा पाठिंबा त्यांना नाही. पक्षाचे धोरण नाही. त्यामुळे पक्ष म्हणुन आम्ही त्यामध्ये सहभागी नाही. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.