गडहिंग्लज (कोल्हापूर) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली. कदाचित भाजपकडे लायक उमेदवार नसावा. त्यामुळे पालकमंत्र्यांनी मला ही ऑफर दिली असावी, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी आज लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गडहिंग्लज शहर व कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी श्री. मुश्रीफ बोलत होते. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर झालेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
श्री. मुश्रीफ म्हणाले," नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थकारणावर परिणाम झाला आहे. बेरोजगारीत वाढ झाली आहे. विदर्भ-मराठवाड्याचे भले करताना पश्चिम महाराष्ट्रावर अन्यायाची भूमिका या सरकारने घेतली आहे. शेजारच्या राज्यात 50-60 कोटी रुपये देऊन आमदार विकत घेतले जात आहेत. भाजपकडे कोठून आला इतका पैसा, हा प्रश्न आहे. देशाला, लोकशाहीला लागलेली ही किड काढून टाकली पाहिजे.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.