आमदार म्हणाले, कानाखाली आवाज काढीन!

शिस्त पाळत नसल्याने आमदार झाले आक्रमक
mla chandrkant jadhav
mla chandrkant jadhav

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्‍वभुमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन एकीकडे प्रशासनाकडून केले जात असताना डी मार्टमध्ये मात्र याची कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे शहराचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी केलेल्या पाहणीत लक्षात आले.

श्री. जाधव यांनी स्वतः खरेदीसाठी आलेल्या लोकांना सुरक्षित अंतरावर राहण्यास सांगितले तर व्यवस्थापनाला "सोशल डिस्टन्सिंग'साठी पट्टे मारण्याचे आदेश दिले, पण दुसऱ्या दिवशीही हे पट्टे न दिसल्याने श्री. जाधव चांगलेच संतापले, याबाबत चुकीची माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्याला त्यांनी "कानाखाली आवाज काढीन' असा दमच भरला.

देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पूर्ण शहर ठप्प आहे. रस्त्यावर शुकशुकाट आहे. तथापि जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने सुरू करण्यास मुभा दिली आहे. आमदार जाधव हे दररोज महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत शहरात फिरून परिस्थितीची आढावा घेतात. दोन दिवसांपुर्वी ते अशीच शहराची फिरती करत असताना ताराबाई पार्कातील डी मार्ट मध्ये गर्दी टाळण्यासाठी कोणतीही शिस्त पाळली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः गाडीतून उतरून खरेदीसाठी आलेल्या लोकांना सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना केल्या तर व्यवस्थापनालाही याची खबरदारी घेण्यास सांगितले.

श्री. जाधव काल पुन्हा याच परिसरात असलेल्या महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठकीसाठी गेले होते. बैठक संपल्यानंतर ते परतत असताना पुन्हा त्यांना डी-मार्टमध्ये कालच्या सुचनांचे पालन न केल्याचे दिसले, त्याचवेळी दोन कर्मचारी मोटरसायकलवरून बाहेर येताना दिसले. त्यांना श्री. जाधव यांनी थांबवून चांगलेच फैलावर घेतले. यावेळी चुकीची माहिती देणाऱ्या एका कर्मचाऱ्याला श्री. जाधव यांनी "कानाखाली आवाज काढीन' अशा शब्दात दम भरला. दोनवेळा श्री. जाधव यांनी या कर्मचाऱ्याला आवाज काढण्याची धमकी दिली. श्री. जाधव यांचा हा व्हीडीओ आज सर्वत्र व्हायरल झाला, त्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com