इचलकरंजी : महायुती सरकारने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना बळ दिले आहे.
तसेच इचलकरंजी शहरातील गावभागातील समस्त नागरिकांनी सदैव आवाडे यांना पाठबळ दिले आहे. हीच भक्कम साथ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल आवाडे यांना देऊन विक्रमी मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ राम जानकी हॉल येथे कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मतदारसंघाच्या निरीक्षक आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, ‘भाजपने तरुण तडफदार राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासात आवाडे परिवाराचे योगदान मोलाचे असून तोच वसा आणि वारसा राहुल आवाडे पुढे घेऊन निघाले आहेत. त्यांना सर्वांच्या भक्कम साथीची गरज आहे. महायुतीच्या सरकारकडून राबवलेल्या योजनांची विरोधकांनी धास्ती घेतल्याने ते योजनांबद्दल अपप्रचार करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.’
यावेळी बाळासाहेब कलागते, अनिल डाळ्या, धोंडीराम जावळे, पापालाल मुजावर, पैलवान अमृत भोसले, वृषभ जैन, नंदू पाटील, दीपक राशिनकर, अश्विनी कुबडगे, वर्षा जोंग, रमा फाटक, सीमा कमते, पांडुरंग म्हातुकडे, गजानन लोंढे, सुशांत कलागते, राजेंद्र बचाटे, किशोर पाटील, एम. के. कांबळ, राजू पुजारी आदी उपस्थित होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.