चंद्रकांतदादा पत्नी अंजलीसह 'सेल्फी पॉईंट'वर... 

चंद्रकांतदादा पत्नी अंजलीसह 'सेल्फी पॉईंट'वर... 

कोल्हापूर : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्नी सौ. अंजली यांच्यासह पोलीस उद्यानात तयार करण्यात आलेल्या "सेल्फी पॉईंट' वर बसून फोटो घेतला. त्यांनी या फोटोसाठी विविध पोझही दिल्या. 

पोलीस उद्यानात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच झेंडा, नवदुर्गा महोत्सव, शहरातील चौक व रस्त्यांचे खाजगीकरणातून सुशोभीकरण, शिवाजी विद्यापीठ परिसरात नेचर पार्क, पोलीस उद्यानाचे सुशोभीकरण आदि उपक्रमातून पालकमंत्री पाटील यांनी शहरात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापुर्वीही जिल्ह्याला आणि शहराला मंत्रीपदे मिळाली पण त्या तुलनेत शहरातील विविध उपक्रमांच्या आयोजनात श्री. पाटील आघाडीवर आहेत. 

आज त्यांच्याच पुढाकाराने पोलीस उद्यान परिसरात "फ्लॉवर फेस्टीवल' चे उद्‌घाटन झाले. तत्पुर्वी निघालेल्या कार्निव्हल मिरवणुकीने त्याची सुरूवात झाली. श्री. पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व फुलांची पाहणी करून श्री. पाटील हे पोलीस उद्यानात तयार करण्यात आलेल्या "सेल्फी पॉईंट' जवळ आले. हा पॉईंट पाहून त्यांनाही आपल्या पत्नीसोबत याठिकाणी फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. ते याठिकाणी बसताच माध्यमांच्या छायाचित्रकारांची त्यांची छबी टिपण्यासाठी एकच घाई उसळली. दादांनीही मग फोटोग्राफरना हव्या तशा पोझ देत या "सेल्फी पॉईंट' चा आनंद लुटला. 

28 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात देशभरातील विविध जातीची फुले ठेवण्यात आली आहेत. स्वागत कमानीजवळच हत्तींच्या भल्या मोठ्या प्रतिकृती लोकांचे आकर्षण ठरल्या आहेत. त्यात डौलाने फडकणारा 302 फुट उंचीच्या तिरंगा ध्वजाने आणखीनच भर टाकली आहे. आज सुट्टीच्या निमित्ताने हा महोत्सव पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com