कट्टर शिवसैनिकांचा रोष ओढवून घेतला आणि राजेश क्षीरसागर झाले पराभूत 

कट्टर शिवसैनिकांची समजूत काढण्याऐवजी त्यांच्या रोष ओढवून घेतल्याचा जबर फटका माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना बसला. कालपरवापर्यंत कट्टर वैरी असलेल्या नगरसेवक सत्यजित कदम यांच्या दारात क्षीरसागर गेले. पण आजी माजी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दारी जाणे त्यांना कमीपणाचे वाटले
Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar

कोल्हापूर : कट्टर शिवसैनिकांची समजूत काढण्याऐवजी त्यांच्या रोष ओढवून घेतल्याचा जबर फटका माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना बसला. कालपरवापर्यंत कट्टर वैरी असलेल्या नगरसेवक सत्यजित कदम यांच्या दारात क्षीरसागर गेले. पण आजी माजी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दारी जाणे त्यांना कमीपणाचे वाटले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे अनेकांनी शिवसेनेचा मार्ग धरला. त्यावेळपासून जी मंडळी कार्यरत आहेत ती आजही शिवसेनेचाच विचार करतात. मुंबईत दसरा मेळाव्याला पदरमोड करून जाणाऱ्या शिवसैनिकांची संख्या आजही काही कमी नाही. मात्र, एखादे मोठे पद मिळाल्यानंतर ठराविक जणांच्या कानात कोणती हवा शिरते हे शिवसैनिकांना आजपर्यंत पडलेले कोडे काही सुटले नाही. कमलाकर जगदाळे. सारखा माणूस कधीकाळी क्षीरसागर यांचा कट्टर समर्थक होता. दुर्गेश लिंग्रस. शशी बिडकर, राजू जाधव, शिवाजी जाधव. दत्ता टिपुगडे, ही मंडळी एकेकाळचे शिलेदार, आमदारांच्या खांद्या खांदा लावून काम करणारी ही मंडळी काळाच्या ओघात दुखावली गेली. 

जिल्हाप्रमूख संजय पवार यांच्याशी असलेले मतभेद आपण एकवेळ मान्य करू. पण ज्या शिवसैनिकांनी सुरवातीपासून साथ दिली त्यांची मने का दुखावली गेली याचा विचार क्षीरसागर यांनी केला नाही. निवडणुकीचा काळ हा नमते घेण्याचा काळ असतो. झाले गेले विसरून सर्वांची मोट बांधून सोबत जावे लागते. ज्येष्ठ नेते शरद पवार हे एका चुकीबद्दल सातारकरांची जाहीर माफी मागतात. इथे माफी मागणे दूरच समोरून जरी कुणी गेला तरी त्याला राजकारणातून उद्धवस्त करण्याची भाषा केली गेली. क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी असले आणि नसले तरी काय फरक पडतो असा विचार केला. याच पदाधिकाऱ्यांनी काय फरक पडतो हे निवडणुकीत दाखवून दिले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला शहराचा मतदारसंघ परस्परांच्या टोकाच्या इर्षेमुळे, आणि खुन्नसी स्वभावामुळे हातातून निसटून गेला. 

महापालिका निवडणुकीत शिवसैनिकांची तिकीट कापण्याचा प्रयत्न झाले. 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. 41 प्लसचा नारा दिला गेला. प्रत्यक्ष चार नगरसेवक निवडून आले. आपल्या उमेदवाराला साथ देण्याऐवजी विरोधी उमेदवाराला साथ दिली गेली. ज्यांची मने दुखावली गेली ते कधी एकदा विधानसभा निवडणूक येते याची वाटच पाहत होते. निवडणूक लागली आणि ही मंडळी थेट विरोधी उमेदवाराच्या गोटात सामील झाली. या निर्णयामुळे ना या मंडळीचे नुकसान ना आमदारांचे झाले. नुकसान झाले ते शिवसेनेचे, त्यामुळे संपर्कप्रमुख हा मुद्दा किती गांभीर्याने घेतात यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com